Bhool Bhulaiyaa2  Instagram
मनोरंजन

​Video: 'भूल भुलैया 2' च्या स्क्रीनिंगला सिद्धार्थ मल्होत्राची एन्ट्री

Bhool Bhulaiyaa2 : सिद्धार्थ मल्होत्रा ​​अलीकडेच 'भूल भुलैया 2' च्या स्क्रीनिंगला पोहोचला जिथे त्याने कियारा अडवाणीला मिठी मारली.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​(sidharth malhotra) आणि कियारा अडवाणी यांच्या ब्रेकअपच्या बातम्या अनेक दिवसांपासून सोशल मिडियावर गाजत आहेत. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की सिद्धार्थ आणि कियारा (kiara advani) वेगळे झाले आहेत, पण त्यानंतर कियाराच्या पोस्टवर कमेंट करताना सिद्धार्थने या बातम्यांना पूर्णविराम दिला. आता ब्रेकअपच्या बातम्यांदरम्यान, सिद्धार्थ आणि कियारा पुन्हा एकत्र दिसले आहेत. (sidharth malhotra hugs kiara advani bhool bhulaiyaa 2 screening video viral)

सिद्धार्थ मल्होत्रा ​​नुकताच 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa2) च्या स्क्रिनिंगला पोहोचला जिथे त्याने कियाराला पाहून त्याला मिठी मारली. 'भूल भुलैया 2' च्या स्क्रीनिंगचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांना आनंदाने मिठी मारताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये (Video) दिसत आहे की, सिद्धार्थ प्रथम कियाराला भेटतो आणि नंतर कार्तिक आर्यनला मिठी मारतो. दोघांना पुन्हा एकत्र पाहून चाहत्यांच्याही आनंदाला पारावार उरला नाही. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'हे लोक एकत्र खूप क्यूट दिसतात'.

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा 'भूल भुलैया 2' हा चित्रपट आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. कार्तिक आणि कियारा पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. सिद्धार्थ आणि कियाराबद्दल बोलायचे झाले तर, दोघेही 'शेरशाह' चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसले होते. या चित्रपटात दोघांची केमिस्ट्री कधी नात्यात बदलली हे कळलेच नाही. यानंतर दोघेही अनेकदा व्हेकेशन, इव्हेंट्सवर एकत्र जाताना दिसले. मात्र, या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे काहीही बोललेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT