Shweta Tiwari Dainik Gomantak
मनोरंजन

Shweta Tiwari Apology: आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर श्वेता तिवारीने मागितली माफी

हा वाद वाढत असल्याचे पाहून श्वेता तिवारीने आपल्या वक्तव्यासाठी माफी मागितली आहे.

दैनिक गोमन्तक

प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) देवाबद्दल वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील भोपाळमधील श्यामला हिल्स पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत श्वेतावर एफआयआर (FIR) दाखल झाला आहे. आगामी वेब सीरिजच्या लॉंच इव्हेंटमध्ये श्वेता म्हणाली होती- 'माझ्या ब्रा ची साईज देवच घेत आहेत' तिचे हे वक्तव्य सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहे. पण हा वाद वाढत असल्याचे पाहून श्वेता तिवारीने आपल्या वक्तव्यासाठी माफी मागितली आहे.

श्वेता तिवारी (Shweta Tiwari) स्पष्टीकरण देतांना म्हणाली कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. तिने आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. तिच्या विधानाचा गैरसमज झाल्याचे म्हणणे आहे. ति स्वतः देवावर खूप विश्वास ठेवते .शब्दांचा चुकीचा अर्थ लावल्या गेला आहे असे श्वेता तिवारीचे म्हणणे आहे. मी केलेल्या वक्तव्याचा पूर्णपणे गैरसमज झाला आहे हे पाहून दु:खत झाले आहे असे ती म्हणाली. मी जाणूनबुजून किंवा नकळत लोकांच्या भावना दुखावणारे असे काहीही करणार नाही किंवा बोलणार नाही, पण हे विधान संदर्भाशिवाय एकलल्याने लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे मला समजले. कृपया माझ्यावर विश्वास ठेवा कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. त्यामुळे माझ्या या विधानामुळे ज्यांना अनवधानाने दुखावले आहे त्यांची मी नम्रपणे माफी मागते.

श्वेता तिवारीवर तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे लोक मोठया प्रमाणात टीका करत आहेत. भोपाळमध्ये श्वेताविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच एमपी मधील गृहमंत्र्यांनी तिच्यावर कारवाई केल्याची चर्चा आहे. आता श्वेताने माफी मागितल्यांनंतर हे प्रकरण शांत होते का हे पाहावे लागेल. श्वेता तिवारीच्या करियरबद्दल सांगायचे झाले तर ती दोन दशकांहून अधिक काळ मनोरंजन उद्योगाचा एक भाग आहे. तिने टीव्ही 'कसौटी जिंदगी की, बिग बॉस, मेरे डॅड की दुल्हन, बेगूसराय यासह लोकप्रिय कार्यक्रम केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT