Shruti Hasan Viral Photo Dainik Gomantak
मनोरंजन

Shruti Hasan Viral Photo: श्रृती हसनचे अस्वस्थ करणारे फोटो पाहिलेत का?

श्रृती हसनचे काही फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री श्रुती हसन साशल मिडियावर नेहमीच सक्रिय असते. ती चाहत्यासह अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. पण अलिकडेच श्रुती हसनने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे ती सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

श्रुतीने (Shruti Hasan) तिच्या इंस्टाग्रामवर (Instagram) अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती खुप साधी दिसत आहे. पहिल्या फोटोत श्रुतीने केस मोकळे सोडले असून दुसऱ्या फोटोत आजारी आणि थकलेली दिसत आहे. हे फोटो (Photo) शेअर करत श्रुतीने कॅप्शनमध्ये लिहिले, “परफेक्ट पोस्ट आणि सेल्फीच्या जगात माझे काही लूक फायनल होऊ शकले नाहीत. खराब केसांचा दिवस, ताप, सायनसमुळे सुजलेला चेहऱ्यासोबतच मासिक पाळीचा त्रास आणि आराम. तुम्हाला माझा हा लूकही नक्कीच आवडेल अशी आशा आहे.”

सुप्रसिद्ध दाक्षिणत्य अभिनेते कमल हसन (Kamal Hasan) यांची मुलगी श्रुती हसन सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी श्रुतीने तिच्या नाकाची सर्जरी केल्याचा खुलासा केला होता. “मी माझ्या नाकाची सर्जरी केली आहे. माझ्या नाकाला दुखापत झाल्यामुळे मी सर्जरी केली.” असे श्रुतीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत स्पष्ट शब्दांमध्ये सांगितले होते.

श्रुतीची हा साधा लुकही लोकांची मनं जिंकत आहे. तिचे हे फोटो लोकांना खूप आवडले आहेत. असले तरी तिच्या साधेपणाचं कौतुक सर्वत्र केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT