Bollywood actress Shraddha Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरच्या आयुष्यात प्रेमाचा बहार! पडली 'या' व्यक्तीच्या प्रेमात?

Shraddha Kapoor: 2022 मध्ये तिचे आणि रोहनचे ब्रेकअप झाल्याची माहीती समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरने आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये एक ओळख निर्माण केली आहे. तीने बॉलीवूडमध्ये अनेक हीट चित्रपटातून आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. मात्र श्रद्धा कपूर ही अभिनयासाठीच नाही तर आपल्या सौंदर्यासाठीदेखील प्रसिद्ध आहे. आता मात्र शक्ती कपूरची लेक तिच्या प्रोफेशनल आयुष्यासाठी नाही तर आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, काही दिवसांपूर्वी श्रद्धा कपूर तू झूठी मै मक्कार या चित्रपटाचे रायटर राहुल मोदी यांच्यासोबत चित्रपट पाहण्यास गेली होती. याशिवाय अनेकदा ते एकत्र दिसून आले होते. त्यामुळे ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. याबरोबरच राहुल मोदी श्रद्धा कपूरच्या पाळीव कुत्र्यांसोबतचे फोटो सोशल मिडियावर पोस्ट करताना दिसतो. त्यामुळे यांच्या नात्यावर वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत.

या आधी श्रद्धा कपूर सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबत जवळपास चार वर्षे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. त्यानंतर 2022 मध्ये तिचे आणि रोहनचे ब्रेकअप झाल्याची माहीती समोर आली आहे.

दरम्यान, राहुल मोदी किंवा श्रद्दा कपूर यांनी त्यांच्या नात्यावर कोणतेही अधिकृत भाष्य केले नाही. मात्र त्यांच्या व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओनंतर नेटकरी त्यांच्या नात्याबद्दल अंदाज बांधताना दिसत आहेत. श्रद्धा राजकुमार राव सोबत स्त्री 2 मध्ये ती दिसून येणार असून सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT