SHOT Body Spray Advertisement Dainik Gomantak
मनोरंजन

SHOT Body Spray Advertisement: बॉडी स्प्रेच्या वादग्रस्त जाहिरातीवर बाॅलिवुड सेलिब्रेटींज भडकले

Body Spray Advertisement: परफ्यूम ब्रँडच्या जाहिरातीवर अनेक कलाकारांनी ट्वीट करत रिअॅक्शन्स दिल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका परफ्यूम ब्रँड कंपनीच्या जाहिरातीची चर्चा सुरू आहे. ही जाहिरात महिलांच्या लैंगिक शोषणाला प्रोत्साहन देत आहे, असे काही लोकांचे मत आहे. महिलांवरील लैंगिक हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या परफ्यूम ब्रँडचे व्हिडीओ त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात यावेत, असा आदेश केंद्र सरकारने यूट्यूब आणि ट्विटरलाही जारी केला आहे. या जाहिरातीवर अनेक बाॅलिवुड सेलिब्रेटींजनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

रिचा चड्ढा
एखादी जाहिरात (Advertisement) शूट करण्याआधी ती क्रिएटिव्ह, स्क्रिप्ट, एजन्सी, क्लायंट, कास्टिंग यांसारख्या अनेक टप्प्यांमधून जात असते. प्रत्येकाला बलात्कार हा विनोद वाटतो का?', असं ट्वीट करत अभिनेत्री रिचा चड्ढाने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

* सोना मोहपात्रा
गायिका सोना मोहपात्राने ट्वीट करत लिहीले, 'थीम - लैंगिक शोषण. माझ्या twitter टाइमलाइनवर मी ती जाहिरात पाहिली. त्यानंतर मी विचार केला की या जाहिरातीला प्रसिद्धी देणे अधिक वाईट आहे.'

फरहान अख्तरनं (Farhan Akhtar) ट्वीटमध्ये 'Shameful' असं लिहित या जाहिरातीवर प्रतिक्रिया दिली आहे.

* ही बॉडी स्प्रेची जाहिरात हटवण्याचे आदेश जारी

या जाहिराती रिलीज होताच सोशल मीडियावर गदारोळ माजला. सर्वांनीच यावर आक्षेप घेण्यास सुरुवात केली. बॉडी स्प्रे ब्रँड लेयर शॉटशी संबंधित दोन जाहिरातींवरून वाद झाल्यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही त्यावर आक्षेप घेतला. आता केंद्र सरकारने यूट्यूब आणि ट्विटर या दोन्ही जाहिरातींवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT