Shilpa Shetty  Dainik Gomantak
मनोरंजन

International Yoga Day: योग दिनानिमित्त शिल्पा शेट्टीने दिल्या खास शुभेच्छा; Video शेअर करत म्हणाली..

International Yoga Day: शिल्पा शेट्टीच्या या पोस्टवर चाहते भरभरुन कंमेटस करताना दिसत आहेत.

दैनिक गोमन्तक

International Yoga Day: बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या अभिनयाबरोबरच आपल्या फिटनेससाठीदेखील ओळखली जाते. शिल्पा शेट्टीने योगाअभ्यासाद्वारे आपल्या आरोग्याची काळजी घेत शरीराचा फीटनेसदेखील उत्तम ठेवला आहे.

अलिकडे शिल्पा शेट्टी योगाअभ्यासाठी मोठ्या प्रमाणात ओळखली जाते. आज आतंरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने तिने सो योगाअभ्यासाचे महत्व सांगत सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ती म्हणते स्वताला मदत करण्यासाठी, जगणं सुसह्य आणखी चांगले करण्यासाठी आणि उत्तमपणे जगण्यासाठी योगाअभ्यास महत्वाचा आहे. स्वस्थ राहा आणि मस्त राहा.

याबरोबरच, हा व्हिडिओ शेअर करताना त्यासोबत खास संदेशही दिला आहे. ती लिहते- 'तुमचं एक स्मितहास्य तुमच्याभोवती आनंद निर्माण करु शकते. परंतु ते करण्यासाठी तुम्ही आनंदी असणं महत्वाचे ठरते. त्यासाठी योगाला तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवा.

सुदृढ आरोग्य, मन आणि बुद्धीसाठी तुम्हाला योगा मदत करेल. कोणीतरी म्हटल्याप्रमाणे निरोगी माणूस हा आनंदी मनुष्य असतो. सर्वांना योगदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!' शिल्पा शेट्टीच्या या पोस्टवर चाहते भरभरुन कंमेटस करताना दिसत आहेत.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आपल्या आरोग्यासाठीचे योगासनांचे महत्व पटवून देण्यासाठी दरवर्षी 21 जूनला हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT