Sheryl Lee Ralph Dainik Gomantak
मनोरंजन

Sheryl Lee Ralph : "त्याने माझी मान पकडली आणि".....टिव्ही अभिनेत्रीचा शो च्या जजवर लैंगिक शोषणाचा आरोप...

एका प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्रीने एका शोच्या जजवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहे

Rahul sadolikar

मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हॉलिवूडचा प्रसिद्ध टीव्ही शो अॅबॉट एलिमेंटरीच्या अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका प्रसिद्ध शो च्या जजने आपले शोषण केल्याचे तिने सांगितले. आता हॉलिवूड अभिनेत्री शेरिल ली राल्फने तिच्या आयुष्यातील एक काळे सत्य सर्वांना सांगितले आहे.

चॅनलशी संबंधित प्रत्येकाला याची माहिती होती, पण कोणीही काही केले नाही. तिने असेही सांगितले की एकदा एका व्यक्तिने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याकरण्याचा प्रयत्न केला होता.

ग्लॅमरच्या दुनियेत जितके तारे कॅमेऱ्यासमोर चमकतात, तितकेच त्यांच्या मागे एक अंधारमय जग असते. आता हॉलिवूड अभिनेत्री शेरिल ली राल्फने तिच्या आयुष्यातील एक धक्कादायक सत्य सांगितलं आहे. काही वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध टीव्ही शोच्या जजने कसा लैंगिक अत्याचार केला हे तिने सांगितले आहे.

हॉलिवूडच्या प्रसिद्ध टीव्ही शो एबॉट एलिमेंटरीची अभिनेत्री शेरिलने सांगितले की, चॅनलशी संबंधित प्रत्येकाला माहित होते की 'शो'चा जज तिचे शोषण करत आहेत आहेत, परंतु कोणीही काहीही केले नाही. अनेकवेळा लोकांनी आपल्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले. तिने 'मी टू' सहन केले आहे.

शेरिल ली राल्फने वे अप विथ अँजेला यी नावाच्या पॉडकास्टमध्ये भाग घेतला. तिने शोमध्ये दावा केला की एका फेमस टेलिव्हिजन पर्सनॅलिटीने तिच्यावर लैंगिक लैंगिक अत्याचार केले होते. शेरिलने सांगितले की जेव्हा तिने एका मोठ्या नेटवर्क इव्हेंटमध्ये तिच्या शोचे प्रमोशन करण्यास सुरुवात केली तेव्हा तिचे शोषण झाले.

ती म्हणते, 'मी खूप सार्वजनिक ठिकाणी होते. मी सूट घातला होता. मी माझ्या टीव्ही शोशी संबंधित काम करत होते, ज्याचा मी त्यावेळी एक भाग होते. तो आणि मी एकाच नेटवर्कवर काम करायचो.

अधिक माहिती देताना, अभिनेत्री म्हणते, 'तो माणूस आत आला, त्याने माझी मान मागून धरली, मला त्याच्याकडे वळवले आणि माझे चुंबन घेऊ लागला.आणि ही गोष्ट सर्वांनी पाहिली. शेरिलने त्या व्यक्तीचे नाव सांगितले नाही.

ती म्हणाली की शोचा जज ग्रेग मॅथिस याचा या सगळ्याशी काही संबंध नाही तो एक चांगला माणूस आहे. दुसरी घटना शेअर करताना शेरिल ली राल्फ यांनी सांगितले की, एका प्रमोटरने तिला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर अभिनेत्री वेगवेगळ्या गोष्टींबद्दल विचार करू लागली. भविष्यात अशा गोष्टींपासून स्वतःला कसे वाचवायचे याचा विचार ती करू लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT