Sherlyn Chopra sensational allegations; against Raj Kundra and Shilpa Shetty  Dainik Gomanatk
मनोरंजन

शर्लिन चोप्राचे, राज कुंद्रा-शिल्पा शेट्टीविरोधात खळबळजनक आरोप

शर्लिन चोप्रा हिने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याविरोधात शारीरिक छळ आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

दैनिक गोमन्तक

प्रसिद्ध अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हिने अलीकडेच शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्रावर (Raj Kundra and Shilpa Shetty) जुलैमध्ये शारीरिक शारीरिक अत्याचाराचा आरोप केला होता. आता शर्लिनने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे.

शर्लिन चोप्रा हिने तिच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिने खुलासा केला आहे की राज कुंद्राने तिचे केवळ शोषण केलेच नाही तर अंडरवर्ल्डला धमकी देखील दिली. आता ती भीतीने जगू शकत नाही असे भाऊक वक्तव्य तिने केले.

'शारीरिक शोषण करून, अंडरवर्ल्डकडून धमकी'

व्हिडिओमध्ये शर्लिन, राज कुंद्रावर आरोप करत म्हणले, 'मुलींकडून तुम्ही काम करून घेता; पण त्याचा मोबदला तुम्ही का देत नाही. तुम्ही त्यांची फसवणूक का करता? तुम्ही त्यांना टोपी का घालता? हा नैतिक व्यवसाय आहे का? तुम्हाला उद्योजक बनायचे आहे, टाटा, अंबानी व्यवसाय कसा करतात ते शिका. आणि आयुष्यात थोडी तरी नैतिकता आणा. ते दिलेली आश्वासने पाळतात. तुम्ही काय करता? तुम्ही कलाकाराच्या घरी जाऊन त्यांचे शारीरिक शोषण करता.

'मी भीतीने जगू शकत नाही'

शर्लिन चोप्रा म्हणाली की तिच्यासाठी हे फक्त पैसे देण्यापुरते नाही तर मला रोज भीतीच्या वातावरणात जागाव लागत आहे असे तिने सांगितले. याबाबत तिने पोलिसांनाही सांगितले. ती पुढे म्हणाली, 'आज मी घाबरणार नाही. मी पोलिसांना सांगितले की मी अशा भीतीने जगू शकत नाही. हे फक्त पेमेंट बद्दल नसून. त्याने निर्माण केलेले भीतीचे वातावरण आता मी सहन करू शकत नाही.

राज कुंद्रा यांनी 2019 मध्ये शारीरिक अत्याचार केले

या व्हिडिओमध्ये शर्लिन चोप्राने शिल्पा शेट्टीविरोधात तक्रार दाखल करण्यामागील कारण सांगितले. जुलै महिन्यात शर्लिन चोप्रा ने राज कुंद्रावर शोषणाचा आरोप केला होता, असा दावा करत राज कुंद्रा दोन वर्षापूर्वी 2019 मध्ये एक दिवस अचानक तिच्या घरी पोहोचला होता आणि तिचा शारीरिक छळ केला होता. शर्लिनने आरोप केला होता की, राज कुंद्राने तिला जबरदस्तीने किस केले होते. शर्लिनच्या मते, त्याने राज कुंद्राला मागे ढकलण्याचा खूप प्रयत्न केला. पण राजने ऐकले नाही आणि ती घाबरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT