shekhar suman  Dainik Gomantak
मनोरंजन

Shekhar Suman : "हे लोक सापापेक्षाही भयंकर यांच्या गँगने मला अनेक प्रोजेक्टमधून बाहेर काढले ! शेखर सुमन कुणाबद्दल बोलले

अभिनेता शेखर सुमन यांनी बॉलिवूडमधल्या काही कलाकारांवर एक धक्कादायक आरोप केला आहे.

Rahul sadolikar

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या राजकारणावरच्या वक्तव्यानंतर बॉलिवूडमध्ये एकच गोंधळ उडाला काहीजण तिच्या पाठिंब्यासाठी पुढे आले. प्रियांका चोप्राच्या ताज्या मुलाखतीने बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कथित 'चित्रपट माफिया' आणि 'गँगबाजी'वर चर्चेला उधाण आले आहे. 

इंडस्ट्रीशी संबंधित अनेक दिग्गजांनी प्रियांका चोप्राला पाठिंबा दिला आहे. प्रियांकाला चित्रपटातून बंदी घालण्याच्या वक्तव्यानंतर आता शेखर सुमन यांनीही प्रियांकाच्या दाव्याला दुजोरा दिला आहे.

 या 'फिल्म माफिया'ने मी आणि माझा मुलगा अध्ययन सुमन याच्यासोबतही असेच केले, असा दावा या शेखर सुमन यांनी केला आहे. शेखर सुमन यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, बॉलीवूडमध्ये 'चार लोक' आहेत, ज्यांनी अध्ययन सुमनविरोधात गँग बनवली आणि अनेक चित्रपट आणि प्रोजेक्टमधून बाहेर फेकले.

शेखर सुमन यांनी ट्विटरवर लिहिले की, 'मी इंडस्ट्रीतील किमान 4 लोकांना ओळखतो ज्यांनी मला आणि अध्यायनला अनेक प्रोजेक्टमधून बाहेर काढण्यासाठी एक टोळी तयार केली.

 मला हे नक्की माहीत आहे. या 'गँगस्टर्स'चा वावर खूप असतो आणि ते रॅटलस्नेकपेक्षाही धोकादायक असतात. पण सत्य हे आहे की ते अडथळे निर्माण करू शकतात पण आपल्याला रोखू शकत नाहीत.

शेखर सुमनच्या या ट्विटनंतर त्याचे चाहते आणि अनेक यूजर्स त्यावर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'तुम्हाला हेवा वाटणाऱ्या लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. 

ईर्ष्यावान लोक कधीही तुमच्या नवीन उपक्रमांवर चर्चा करू इच्छित नाहीत. त्याला तुमची प्रशंसा नको असेल. तुम्ही प्रत्यक्षात काय करत आहात यात त्यांना रस नाही.

एका युजरने सांगितले की, 'अध्ययन सुमन नक्कीच एक चांगला अभिनेता आहे आणि त्याच्याकडे वेब सीरिजच्या रूपात आपली प्रतिभा दाखवण्यासाठी भरपूर संधी आहेत.

 माझ्या मते शेखर सुमन सर जरा चांगले आहेत, कारण त्या काळात त्यांच्याकडे असे व्यासपीठ नव्हते, पण तरीही त्यांनी त्यांच्या कॉमिक टायमिंगद्वारे स्वतःची एक चांगली प्रतिमा निर्माण केली आहे.'

दुसर्‍या चाहत्याने कमेंट करताना लिहिले की, 'हे कधी थांबणार आहे का आणि संपणार आहे तर कसे. तुम्हाला आणि तुमच्या मुलालाही याचा सामना करावा लागत आहे हे खेदजनक आहे. 

विशेष म्हणजे, प्रियांका चोप्राच्या धक्कादायक दाव्यानंतर कंगना राणौत, अमाल मल्लिक आणि अपूर्व असरानी यांसारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी यावर संताप व्यक्त केला आहे. प्रियांकाने एका परदेशी पॉडकास्टमध्ये सांगितले की, ती बॉलिवूडच्या राजकारणाला कंटाळली होती आणि म्हणून तिने सर्व काही सोडून अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT