Shahrukh khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Shahrukh khan: 'पठाण' चित्रपटाच्या यशासाठी शाहरुखचे माता वैष्णोदेवीला साकडे....

Shahrukh khan: शाहरुखचा वैष्णोदेवी दर्शनाचा व्हिडीओ व्हायरल

गोमन्तक डिजिटल टीम

Pathan Movie: अभिनेता शाहरुख खान एक उत्तम कलाकार आहेच पण त्याचबरोर तो प्रचंड धार्मिकही आहे. सगळ्या धर्मावर शाहरुखची सारखीच श्रद्धा आहे. म्हणुनच मक्केला जाऊन आल्यानंतर शाहरुखने कटरा इथं जात वैष्णोदेवीचे दर्शन घेतले.

देवावरची त्याची भक्ती त्याने अनेकदा व्यक्तही केली आहे. आपल्या यशाबद्दल बोलताना कित्येकदा शाहरुखने देवाचे आभार मानले आहेत. सध्या किंग खानचा पठाण जानेवारीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्याच सक्सेससाठी शाहरुखने आता माता वैष्णोदेवीकडे साकडे घातले आहे. शाहरुख वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

शाहरुख आपल्या काही सहकाऱ्यांसोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेल्याचं या व्हिडीओत आपण पाहु शकतो. यावेळी कुणी ओळखु नये यासाठी शाहरुखने आपल्या चेहरा मास्क लावला होता. तुम्ही आतापर्यंत शाहरुखला वेगवेगळ्या भुमीकांमधुन बघितले असेल.

रोमॅंटिक रोल्समध्ये शाहरुखला बघणे त्याच्या फॅंन्ससाठी एका सुंदर स्वप्नाहुन कमी नसतं. आता शाहरुखच्या (Shahrukh khan) या धार्मिक स्वभावामुळे फॅंन्स शाहरुखवर आणखी फिदा होणार हे नक्की. कित्येक शोमधुन किंग खानने त्याच्या देवावरच्या भक्तीबद्दल सांगितलं आहे.

पठाणच्या (Pathan) माध्यमातुन शाहरुख खुप काळानंतर पुन्हा समोर येत आहे. साहजिकच पठाण काही वेगळ घेवुन येणार हे नक्की. आपल्या लाडक्या स्टारच्या फिल्मची फॅंन्स आतुरतेने वाट बघत असतात. त्यात किंग खानचे फॅंन्स आपल्या स्टारसाठी किती वेडे आहेत हे दरवर्षी मन्नतवर होणाऱ्या गर्दीवरुन लक्षात येतेच. शाहरुखची केवळ एक झलक दिसावी म्हणुन खुप दुरवरुन फॅंन्स येत असतात. शाहरुखच्या फॅन्समध्ये फिमेल फॅन्सची संख्या लक्षणीय आहे.

पठाण फिल्ममध्ये शाहरुखसोबत दिपीका पदुकोन (Deepika Padukone) जॉन अब्राहम (John Abraham) मुख्य भुमिकेत दिसणार आहे. पदार्पणातच किंग खानसोबत एक हीट फिल्म देणारी दिपीका पुन्हा एकदा किंग खानसोबत दिसणार आहे. शाहरुखचा पठान हा चित्रपट 25 जनवरी 2023 रोजी प्रदर्शीत होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिल आणि तेलगू भाषेमध्ये रिलीज होणार आहे.

आतापर्यंत या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स रिलीज झाले आहेत. एका पोस्टरमध्ये तर किंग खानचा लुक बघुन फॅंन्स वेडावून गेले आहेत. या पोस्टरमध्ये शाहरुखचे लांब आणि भुरभुरणारे केस आणि जबरदस्त फिटनेस पाहुन फॅंन्स खुश होत आहेत. शाहरुखचा हा बहुचर्चित चित्रपट नेमका कसा आहे हे बघणं जास्त इंटरेस्टींग असणार आहे. आता बघुया माता वैष्णोदेवीचा आशिर्वाद शाहरुखला मिळतोय की नाही ते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT