Shamita Shetty and Raqesh Bapat) Dainik Gomantak
मनोरंजन

ब्रेकअपच्या अफवांनंतर शमिता शेट्टी-राकेश बापटचं प्रेम आणखी खुललं

शमिता शेट्टीचे राकेश बापटसोबत ब्रेकअप झाल्याचे बोलले जात होते

दैनिक गोमन्तक

टेलिव्हिजन ट्रेंडींग कपल शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि राकेश बापट (Raqesh Bapat) यांच्याबाबत धक्कादायक बातमी समोर आली असून दोघांचे ब्रेकअप झाल्याचे बोलले जात होते. पण तुम्हाला माहीत आहे का या बातम्यांचे सत्य काय आहे? शमिता आणि राकेशच्या नात्याचे सत्य काय आहे ते आम्ही या रिपोर्टमध्ये सांगत आहोत. (Shamita Shetty and Raqesh Bapat)

शमिता-राकेशच्या ब्रेकअपमागचं सत्य काय?

शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्या ब्रेकअपची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये येताच शमिता शेट्टीची लगेच प्रतिक्रिया आली. शमिता शेट्टीने चाहत्यांना दिलासा देताना सांगितले की, तिचे आणि राकेशचे ब्रेकअप झालेले नाही. दोघे अजूनही सोबत आहेत. शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांनी इंस्टा स्टोरीवर एक संयुक्त निवेदन जारी करताना लिहिले - आम्ही तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, आमच्या नात्याबद्दलच्या अशा कोणत्याही अटकळांवर विश्वास ठेवू नका. या बातम्यांमध्ये तथ्य नाही.

शमिता शेट्टी-राकेश बापट यांची पोस्ट

शमिता आणि राकेशची जोडी अजूनही कायम आहे. शमिता आणि राकेशच्या चाहत्यांना या दोघांनाही एकत् बघायला खूप आवडते. बिग बॉस ओटीटीमध्ये दोघांचे प्रेम फुलले होते. या शो मधील त्यांच्यात उडणाऱ्या आंबट गोड खटक्यांचे प्रेक्षकांनी कौतुक केले. शमिता आणि राकेशची जोडी शो संपल्यानंतरही कायम होती. यावर्षी शमिताने तिचा बर्थडे बॉयफ्रेंड राकेश बापटसोबत साजरा केला. शमिता आणि राकेश यांनी व्हॅलेंटाईन देखील एकत्र साजरा केला, हे कपल अनेकदा आउटिंग किंवा डिनर डेटवर एकत्र पाहिले जाते.

Shamita Shetty and Raqesh Bapat post

शमिताच्या आयुष्यात बॉयफ्रेंडचा प्रवेश

शमिता शेट्टी आणि राकेश बापट ही जोडी अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.त्यामुळे त्यांच्या मैत्रिचे प्रेमात रूपांतर झाल्याने चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. शमिता राकेशबद्दल सिरियस रिलेशनशीपचा विचार करते आहे. त्या दोघांनाही आपले नाते लग्नापर्यंत घेऊन जायचे आहे. पण त्याआधी दोघांनीही एकमेकांना जाणून घ्यायचे असे ठरवले आहे. आता शमिताच्या आयुष्यात ब-याच वेळानंतर एका चांगल्या बॉयफ्रेंडचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे त्यांना आता लग्नाची कसलीही घाई नाही. बाकी माध्यमांमध्ये पसरत असलेल्या अफवा खोट्या असून शमिता आणि राकेश एकमेकांवर प्रेम करत आहेत. आणि ते एकमेकांना वेळ देत आपले नाते समृद्ध करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT