Jawan Leack Dainik Gomantak
मनोरंजन

Jawan Movie Leack : रिलीज दिवशीच जवानला मोठा धक्का...एचडी चित्रपट या साईटवर झाला लीक

शाहरुख खानचा जवान रिलीजच्या दिवशीच लीक झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे.

Rahul sadolikar

Shahrukh khan's Jawan online Leak : अभिनेता शाहरुख खानचा जवान 7 सप्टेंबरला जगभरात रिलीज झाला आणि 'पठान'नंतर आतुरतेने वाट पाहणाऱ्या त्याच्या चाहत्यांनी उत्सवच साजरा केला.

ही गोष्ट पठानच्या वेळीही सिद्ध झालीय की शाहरुखच्या चाहत्यांसाठी त्याचा चित्रपट एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसतो.

शाहरुख खान आणि विजय सेतूपती

गेले काही दिवस मनोरंजन विश्वात शाहरुख खान आणि विजय सेतूपती यांची भूमीका असणारा जवान चर्चेचा विषय बनला आहे.

चित्रपटात साऊथची ब्युटी क्वीन नयनतारा, दिपीका पदूकोन यांच्याही भूमीका आहेत.

जवानकडून निर्मात्यांना अपेक्षा

जवानकडून निर्माते आणि स्टार्सना खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. 

मात्र याचदरम्यान 'जवान' चित्रपटाबाबत एक वाईट बातमी समोर आली आहे. वास्तविक, शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. 

amilRockers , MP4Movies, Pagalworld, VegaMovies आणि Filmyzilla या साईटवर चित्रपट रिलीज झाल्याने मोठी खळबळ उडाली

आता या चित्रपटाच्या लीकचा बॉक्स ऑफिसवर कितपत परिणाम होतो हे पाहायचे आहे. 

निर्मात्यांना होऊ शकतं नुकसान

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान , नयनतारा आणि विजय सेतुपती यांचा चित्रपट ' जवान ' रिलीजच्या पहिल्याच दिवशी ऑनलाइन लीक झाला आहे. 

'जवान' हा चित्रपट TamilRockers , MP4Movies, Pagalworld, VegaMovies आणि Filmyzilla यासह अनेक साइटवर ऑनलाइन लीक झाला आहे . 

 चित्रपट लीक झाल्यानंतर निर्मात्यांना यामुळे करोडो रुपयांचे नुकसान होऊ शकते असे मानले जात आहे. चित्रपटांच्या पायरसीचा विषय अनेकदा इंडस्ट्रीत कळीचा मुद्दा बनला आहे.

 पठानही लीक

याआधीही शाहरुखचा चित्रपट लीक झाला आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा 'पठाण' देखील ऑनलाईन लीकचा बळी ठरला आहे.

  पठानच्या लीकच्या चित्रपटाच्या कमाईवर फारसा परिणाम झाला नाही. शाहरुख खानचा 'जवान' पहिल्याच दिवशी कमाई करेल, सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरणार असा अंदाज बांधण्यात येत आहे.

चिपटाचं आगाऊ बुकींग

'जवान' चित्रपट लीक झाल्याच्या बातमीने निर्मात्यांना धक्का बसलेला असतानाच, दुसरीकडे चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगच्या आकड्यांमुळे निर्मात्यांना खूप आनंद झाला.

 मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या 'जवान' चित्रपटाने आगाऊ बुकिंगमध्ये 50 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई

चित्रपट व्यापार तज्ज्ञांनुसार शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती यांची मुख्य भूमीका असणारा हा चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करेल.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT