Shahrukh Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Shahrukh Khan: वाढदिवसादिवशीच किंग खान उडवणार 'डंकी' चा बार

Shahrukh Khan: किंग खान आपला वाढदिवस कसा साजरा करणार याची माहीती समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Shahrukh Khan: ज्या अभिनेत्याने आपल्या सहज अभिनयाने, दिसण्याने आणि वागण्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. गेल्या अनेक वर्षापासून एकापेक्षा एक चित्रपटातून मनोरंजन सृष्टीत आपले महत्वाचे योगदान दिले. भारतात आणि भारताबाहेरही ज्याचे लाखो- करोडो चाहते आहेत तो अभिनेता म्हणजे शाहरुख खान होय.

२ नोव्हेंबरला किंग खान आपला ५८ वा वाढदिवस साजरा करणार आहे. आता शाहरुखने त्याच्या वाढदिवसाची जय्यत तयारी केली आहे. किंग खान आपला वाढदिवस कसा साजरा करणार याची माहीती समोर आली आहे.

शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी एकत्र बर्थडे पार्टीचे आयोजन करणार असल्याचे बोलले जात आहे. पूजा ददलानीचा 40 वा वाढदिवस 2 नोव्हेंबरला आहे.  शाहरुखने फिल्म इंडस्ट्रीतील प्रत्येक अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्मात्याला त्याच्या 58 व्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी आमंत्रित केल्याची माहीती समोर आली आहे.

करण जोहर, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, एटली, राजकुमार हिरानी आणि काजोल शाहरुखच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होऊ शकतात. सलमान खान( Salman Khan )ही या पार्टीत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. शाहरुखची बर्थडे पार्टी बीकेसी, वांद्रे येथे होणार आहे.

यावर्षी म्हणजेच २०२३ ला शाहरुख( Shahrukh Khan )चे दोन चित्रपट पठाण आणि जवान बॉक्स ऑफीसवर ब्लॉकबस्टर ठरले आहेत. आता तो त्याच्या यावर्षीच्या तिसऱ्या मोठा चित्रपट घेऊन येण्यास सज्ज झाला आहे.

त्याच्या डंकी या चित्रपटाचा टीझर त्याच्या वाढदिवसादिवशी रिलिज होणार असून तो त्याच्या चाहत्यासोबत हा टीझर पाहणार असून त्यानंतर तो मन्नत या त्याच्या बंगल्याजवळ आलेल्या त्याच्या चाहत्यांना भेटणार असल्याचे म्हटले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT