Shah Rukh Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Shahrukh - Alia Dance Video :आलिया- रश्मिका नाटू नाटू वर तर शाहरुख थिरकला झुमे जो पठाण वर

'अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन प्रसंगी शाहरुख, आलिया आणि रश्मिकाने ठेका धरला होता..

Rahul sadolikar

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा उद्घाटन सोहळा दोन दिवस मुंबईत आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक बडे राजकारणी आणि सिनेतारक सहभागी झाले होते. 

हॉलिवूडपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींनी दुसऱ्या दिवशी सभागृहात डान्स परफॉर्मन्स दिला. या लिस्टमध्ये शाहरुख खान व्यतिरिक्त रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा, वरुण धवन, आलिया भट्ट आणि रश्मिका मंदान्ना या स्टार्सनी आपल्या डान्सने उपस्थितांना खुश केले.

एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. आता या गाण्याची प्रतिध्वनी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्येही ऐकू आली. 

या गाण्यावर आलिया भट्टने साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत डान्स केला. या व्हिडिओमध्ये आलिया शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे, तर रश्मिका साडीमध्ये नाटू-नाटूची हुक स्टेप करताना दिसत आहे.

बॉलीवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खान अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात नाचणार नाही हे शक्य नाही. रात्री उशिरा अभिनेत्याने पठाण चित्रपटातील गाण्यावर जबरदस्त डान्स केला. यादरम्यान शाहरुखने एकटा डान्स केला नाही, तर रणवीर सिंग आणि वरुण धवननेही त्याच्यासोबत डान्स केला ज्याने पठाणची हुक स्टेप केली. 

शाहरुख इथेच थांबला नाही तर त्याने त्याची आयकॉनिक पोजही दिली. त्याचबरोबर या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजपने गोव्याला केले ‘नशायुक्त’ राज्य; भाजप सरकारवर काँग्रेसचा घणाघाती आरोप

Horoscope: गुरुवार ठरणार खास! 'या' राशींना नोकरी-व्यवसायात मोठं यश, धनलाभ आणि प्रगतीचे प्रबळ संकेत

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Arpora Nightclub Fire: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

SCROLL FOR NEXT