shilpa shetty and shehnaaz gill Dainik Gomantak
मनोरंजन

शहनाज गिल आणि शिल्पा शेट्टीचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल

शहनाज गिल बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या 'शेप ऑफ यू' या टॉक शोमध्ये पाहुणी म्हणून आली होती.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या तिच्या 'शेप ऑफ यू' या टॉक शोमुळे चर्चेत आहे. दरम्यान, अभिनेत्री शहनाज गिल शिल्पा शेट्टीच्या शोमध्ये पोहोचली होती, ज्यावरून हा शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिल्पा शेट्टी आणि शहनाज गिलचा एक व्हिडिओही समोर आला आहे जो खूप व्हायरल होत आहे. (Shahnaz Gill and Shilpa Shetty's dance is going viral)

वास्तविक, 'शेप ऑफ यू'चा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमो व्हिडिओमध्ये शहनाज गिलची धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळत आहे. शहनाज गिलची नखरेबाज स्टाइल पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये शहनाजही शिल्पा शेट्टीसोबत डान्स करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये शहनाज गिल (Shehnaaz Gill) तिलाही शिल्पा शेट्टीसारखं फिट व्हायचं आहे असं म्हणताना ऐकू येत आहे, अभिनेत्री शिल्पाला म्हणते की आपण डान्स केला नाही तर त्या फिगरचा काय उपयोग… हा व्हिडिओ स्वत: शिल्पा शेट्टीने Instagram. वर शेअर केला आहे. यासोबतच अभिनेत्रीने एक सुंदर कॅप्शनही लिहिले आहे - 'तो कंटाळवाणा दिवस नव्हता आणि तिथे कंटाळवाणे लोक नव्हते.

शहनाज गिलने नुकतेच डब्बू रतनानीसाठी फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये तीचा ग्लॅमरस लूकचेही खूप कौतुक झाले आहे. दुसरीकडे, शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये न्यायाधीश म्हणून चर्चेत राहिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT