Shahid - Kareena Viral Photo Dainik Gomantak
मनोरंजन

Shahid - Kareena Viral Photo : फक्त 500 रुपयांसाठी शाहिद - करीनाचा तो फोटो व्हायरल...

अभिनेता शाहिद कपूर आणि करीना कपूरच्या एका व्हायरल फोटोची सध्या सोशल मिडीयावर चर्चा होत आहे.

Rahul sadolikar

सध्या शाहिद कपूर आणि करीना कपूरचा एक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता शाहीद कपुर. शाहीद कपुरने आजवर अनेक सिनेमांमध्ये दमदार भुमिका साकारल्या.

कधी ऐतिहासीक, कधी अॅक्शन तर कधी रोमॅंटीक अशा विविध भुमिकांमधुन शाहीद वारंवार प्रेक्षकांच्या भेटीला येत राहीला. अशातच शाहीदने त्याच्या भुतकाळाबद्दल धक्कादायक खुलासा केलाय. शाहीद - करीना कपूरचा किसींग फोटो फक्त ५०० रुपयांसाठी लीक झाला होता.

मी उद्ध्वस्त झालो होतो

'मिड डे'शी संवाद साधताना शाहिद कपूर म्हणाला की, हा फोटो बाहेर आल्यावर शाहीद 'उद्ध्वस्त' होण्याच्या मार्गावर होता. तो म्हणाला, 'मी त्यावेळी उद्ध्वस्त झालो होतो.

मी फक्त 24 वर्षांचा होतो आणि मला वाटले की माझ्या प्रायव्हसीवर कोणीतरी आक्रमण केले गेले आहे. याशिवाय मी माझी प्रायव्हसी संरक्षणासाठी काहीही करू शकत नाही. मी विचार करत होतो, काय झालंय आणि काय होतंय. याचा तुमच्यावर खूप चुकीचा परिणाम होतो. तो म्हणाला की विशेषत: त्या वयात, जेव्हा एखाद्याला त्यांच्या भावना समजू लागतात आणि डेटिंग सुरू होते, तेव्हा या गोष्टी घडल्या.

शाहिद म्हणतो

या क्षणी सोशल मीडिया आणि पापाराझी संस्कृती लक्षात घेऊन आता गोष्टी कशा बदलल्या आहेत असे विचारले असता,

शाहिद म्हणाला, 'जेव्हा आमचा फोटो लीक झाला तेव्हा मला कल्पना होती की पुढच्या क्षणी आमचे काय होणार आहे. त्यावेळी आम्ही घाबरून गेलो होतो. याशिवाय आता माझे लग्न झाले आहे, मुले आहेत. अजुनही थोडीफार भीती वाटते.

शाहिद- करीनाचा फोटो व्हायरल

फोटो कसा लीक झाला याबद्दल शाहिदला सांगण्यात आले की, 'आमच्या स्टुडिओत दोन मुले आली आणि त्यांनी सांगितले की जर तुम्ही 500 रुपये दिले तर आम्ही तुम्हाला शाहीद आणि करीनाचा क्लबमध्ये किस करतानाचा फोटो देऊ.

शाहीदला ब्लॅकमेल करण्यात आलं. शाहीदने पैसे देण्यास मनाई केली आणि शाहीद - करीनाचा हा फोटो वाऱ्यासारखा पसरला' शाहीद - करीनाचं नंतर ब्रेकअप झालं. शाहीदने मीरा राजपुत सोबत तर करीनाने सैफ अली खान सोबत लग्न केलं. दोघेही सध्या आपापल्या संसारात सुखी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT