Shahid Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

Shahid Kapoor Fees Cut: शाहिद कपूर पासून क्रिती सेनॉनपर्यत अनेक सिताऱ्यांनी केली मानधनात कपात; 'हे' आहे कारण

Shahid Kapoor Fees Cut: ट्विटनुसार शाहिद कपूरने आपले मानधन कमी केले आहे.

दैनिक गोमन्तक

Shahid Kapoor Fees Cut: बॉलीवूड इंडस्ट्री सध्या कठीण काळाचा सामना करत आहे. याचे कारण म्हणजे कोरोनानंतर बॉलीवूड चित्रपट आपली जादू दाखवण्यात सातत्याने अपयशी ठरत आहे. सतत फ्लॉफ चित्रपटांमुळे बॉलीवूडच्या सिताऱ्यांनापुढेदेखील मोठे संकट निर्माण झाले आहे.

बॉक्स ऑफीसवर चित्रपट अपेक्षेप्रमाणे कमाई करत नसल्याने निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यासमोर दुहेरी समस्या निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळेच बॉलीवूडच्या या संकटकाळात अभिनेते आणि अभिनेत्री यांनी आपले करोडोंचे मानधन कमी करावी असे म्हटले जात होते. आता एक ट्विट चर्चेत आले आहे. आता बॉलीवूडच्या काही सिताऱ्यांनी आपले मानधन कमी केल्याचे हे ट्वीट चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे.

चित्रपट समीक्षक उमैर संधू यांनी केलेल्या ट्विटनुसार शाहिद कपूरने आपले मानधन कमी केले आहे. याआधी बॉलीवूडचा खिलाडी अशी ओळख असलेल्या अक्षय कुमारने देखील आपले मानधन कमी केल्याची माहीती समोर आली होती.

आता उमैर संधू यांनी केलेल्या ट्विटनुसार, शाहिद कपूर, रणवीर सिंह, क्रिती सेनन यांच्याबरोबर वरुण धवण आणि जान्हवी कपूर यांनीदेखील आपल्या मानधनात कपात केली आहे.

दरम्यान, रणवीर सिंहचे 83, जयेश भाई जोरदार, सर्कस सारखे चित्रपट बॉक्स ऑफीसवर फ्लॉफ ठरल्यानंतर त्याने आपल्या मानधन 40 कोटी रुपयांवरुन 30करोड रुपए केल्याचे म्हटले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Gochar 2026: शनीचे 'महागोचर'! 5 राशींच्या लोकांना बनवणार करोडपती आणि भाग्यवान; आयुष्यात येणार सुखाचे दिवस

Maharashtra ATF VAT Reduction: विमान प्रवाशांसाठी गुड न्यूज! फडणवीस सरकारनं घेतला मोठा निर्णय; विमान इंधनावरील 'व्हॅट' थेट 18 टक्क्यांवरुन 7 टक्क्यावर

PM Modi UAE Visit 2026: "होर्मुजची कोंडी फुटणे ही आमची प्राथमिकता'' पीएम मोदींचा युएईच्या भूमीवरुन जगाला शांततेचा संदेश

Viral Video: "मीच खरा मोगली" म्हणत पठ्ठ्याचा सापाशी पंगा, डंक मारताच हुसेन बोल्टसारखा सुस्साट; नेटकरी म्हणाले, 'एका झटक्यातच जिरली'

उघड्यावर कचरा टाकल्यास 5 हजारांचा दंड, नास्नोळा पंचायत मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; जागरूक नागरिकांना 10 हजारांचे बक्षीस

SCROLL FOR NEXT