Dunki updates Dainik Gomantak
मनोरंजन

Dunki Poster: सीमारेषा ओलांडण्यासाठी शाहरुख सोबत 'हे' कलाकारही तयार

Dunki Poster: आता 'डिंकी' आणि 'सालार' मधला कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारतो हे पाहायचे आहे.

दैनिक गोमन्तक

Dunki Poster: शाहरुखचा आगामी चित्रपट डंकीची मोठी चर्चा सुरु आहे. किंग खानच्या ५८ व्या वाढदिवसादिवशी या चित्रपटाचा टीझर रिलिज झाला होता. आता डंकीच्या पोस्टरची चर्चा सुरु आहे.

रिलिज करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये शाहरुखसोबत तापसी पन्नू , विकी कौशल, विक्रम कोचर, अनिल ग्रोव्हरदेखील दिसत आहेत. पोस्टरमध्ये शाहरुख खान सीमा ओलांडण्यासाठी मेहनत करताना दिसत आहे.

'डंकी'चे नवीन पोस्टर रिलीज

राजकुमार हिरानी आणि गौरी खान निर्मित जिओ स्टुडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्स यांची अभिजात जोशी, राजकुमार हिरानी आणि कनिका धिल्लन लिखित 'डंकी' डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

डंकीच्या टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता डंकिच्या टीझरलादेखील प्रेक्षकांकडून पसंत केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सोशल मिडियावर पोस्टर शेअर करत शाहरुखने म्हटले आहे की, यामध्ये आम्ही सगळे तसेच दिसत आहोत, ज्याप्रकारे राजू सरांनी कल्पना केली होती. या ख्रिसमसला चित्रपटगृहात हा चित्रपट दाखल होणार आहे.

'डंकी'च्या रिलीज डेटबद्दल बोलायचे झाले तर प्रभासचा 'सालार'ही त्याच दिवशी रिलीज होत आहे. आता 'डिंकी' आणि 'सालार' मधला कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारतो हे पाहायचे आहे. या दोन्ही चित्रपटांची प्रचंड क्रेझ आहे.

आता प्रेक्षकांच्या मनावर कोणता चित्रपट राज्य करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यावर्षी शाहरुखच्या पठाण आणि जवान दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातला होता. आता डंकी नवीन रेकॉर्ड करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT