Shabana Azami on Zeenat Aman Dainik Gomantak
मनोरंजन

Shabana Azami on Zeenat Aman : झीनत अमानच्या इन्स्टाग्रामवरच्या आगमनाबद्दल शबाना आजमी म्हणाल्या "ती तिच्या जगलेल्या....

ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर अकाऊंट उघडलं, त्यावर आता अभिनेत्री शबाना आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Rahul sadolikar

70 च्या दशकात आपल्या अभिनय आणि हॉट दिसण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री झीनत अमान यांच्या इन्स्टाग्रामवर येण्याबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शबाना आझमी यांनी तरुण कलाकारांशी 'स्पर्धा करण्याचा प्रयत्न न केल्याबद्दल' आणि तिच्या इंस्टाग्राम पोस्ट्स 'फालतू नसल्याबद्दल' झीनत अमान यांचे कौतुक केले.

शबाना आजमी म्हणतात

याचवर्षी, झीनत अमान आणि सायरा बानो या दिग्गज कलाकारांनी इन्स्टाग्रामवर पदार्पण केले .इंडिया टुडेला दिलेल्या एका नवीन मुलाखतीत , शबाना यांनी सोशल मीडियावर असण्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्यांना 'एक व्हिजीबिलीटी' कशी मिळते याबद्दल सांगितले. 

या वर्षाच्या सुरुवातीपासूनच, झीनत अमान तिच्या बोलक्या कॅप्शन आणि नॉस्टॅल्जिक पोस्टने चाहत्यांना प्रभावित करत आहे. आणि आता शबाना आजमींनी तिची प्रशंसा केली आहे आणि तिला 'सोशल मीडियावर कसं प्रेम केले जात आहे'याबद्दलही त्या बोलल्या आहेत.

झीनत अमानचे कौतुक

“झीनतसारखे लोक, ज्यांना सोशल मीडियावर असणं खूप आवडते, ती जे काही लिहिते आहे त्यामुळेच. ते फालतू नाही. ती 24 वर्षांच्या मुलांशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत नाही. ती जगलेल्या जीवनाबद्दल बोलत आहे आणि ते आकर्षक आहे. ती सोशल मीडियावर आहे, पण ती सोशल मीडियावर निर्माण झालेल्या जगाला वाव देत नाही, असे शबाना आझमी यांनी इंडिया टुडेला सांगितले.

लोकांची स्मरणशक्ती कमी असते

शबाना यांनी आजच्या काळात प्रासंगिक राहण्याचे महत्त्वही सांगितले.  त्याच मुलाखतीत त्या म्हणाल्या, “खरं म्हणजे, लोकांची स्मरणशक्ती कमी असते आणि तरुणांना आम्ही ज्या कलाकारांची प्रशंसा केली आहे त्यापैकी एकही आठवत नाही. 

तुमचे काम असणे आवश्यक आहे

प्रासंगिक आणि व्हिजीबल राहणे अत्यंत महत्वाचे आहे कारण आपण भूतकाळातील वैभवाचा आनंद घेऊ शकत नाही. तुम्हाला आज काहीतरी करायचे आहे, चित्रपटच नाही, तर काहीतरी विशिष्ट असं काहीतरी जिथं तुम्ही दिसता. परंतु, व्हिजीबल राहण्यासाठी, तुम्हाला काही गोष्टी करणे आवश्यक आहे, यावर माझा विश्वास नाही; तुमचे काम काही महत्त्वाचे असणे आवश्यक आहे. 

सोशल मिडीयाबद्दल शबाना आझमी म्हणतात

केवळ व्हिजीबिलीटीसाठी सोशल मीडियावर असण्याबद्दल मी बोलत नाही, पण जर ते नैसर्गिकरीत्या येत असेल तर का नाही? काही विश्वासार्हतेच्या पलीकडे नसलेल्या बिंदूपर्यंत मी ते करते. अर्थात, जेव्हा माझे चित्रपट प्रदर्शित होत असतात, तेव्हा मी काहीतरी पोस्ट करते, पण मी त्याबद्दल अधिक बोलत नाही.”

शबाना आजमी चर्चेत

तिचा अलीकडील चित्रपट रॉकी और रानी की प्रेम कहानी 28 जुलै रोजी प्रदर्शित झाला. करण जोहरचे सात वर्षांच्या विश्रांतीनंतर पुनरागमन करत असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे . रॉकी और रानी की प्रेम कहानी मधील धर्मेंद्र आणि शबाना यांच्या ऑन-स्क्रीन किसनेही लक्ष वेधून घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचे 11वे अवतार!' भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ; सांगितले 'हे' कारण

SCROLL FOR NEXT