Shaakuntalam box office day 1 collection Dainik Gomantak
मनोरंजन

Shaakuntalam box office day 1 collection : समंथाच्या 'शाकुंतलम'चा बॉक्स ऑफिसवर कल्ला..पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

अभिनेत्री समंथाच्या 'शाकुंतलम' ने पहिल्या दिवशी मोठी कमाई केली आहे

Rahul sadolikar

समंथा रुथ प्रभू ची मुख्य भूमीका असलेला शाकुंतलमने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला आहे. सर्व भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात ₹ 3 कोटी कमावले आहेत . 

गुणशेखर दिग्दर्शित या चित्रपटात देव मोहन यांचीही भूमिका आहे. हा चित्रपट 14 एप्रिल रोजी हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत थिएटरमध्ये दाखल झाला.

शाकुंतलम हा तेलगू चित्रपट, कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलम या लोकप्रिय भारतीय क्लासिक नाटकावर आधारित आहे. एक लहरी कथा म्हणुन ओळखले जाणारे, शकुंतलम देव यांनी साकारलेली शकुंतला (समंथा) आणि राजा दुष्यंत यांच्या महाकाव्य प्रेमकथेभोवती फिरते. 

राजा दुष्यंत शकुंतलाला जंगलात शिकारीच्या प्रवासाला निघाला असताना त्याला भेटतो. ते प्रेमात पडतात आणि गंधर्व पद्धतीनुसार लग्न करतात.

मिळालेल्या माहितीनुसार, शकुंतलमने ' सर्व भाषांसाठी पहिल्याच दिवशी ₹ 3 कोटींची कमाई केली'. चित्रपटाने तेलगूमध्ये ₹ 2.43 कोटी, हिंदीमध्ये ₹ 0.4 कोटी, तमिळमध्ये ₹ 0.15 कोटी आणि मल्याळममध्ये ₹ 0.02 कोटी कमावले.

शनिवारी राधाकृष्ण एन्टरटेन्मेंट्सने ट्विटरवर चित्रपटाविषयी अपडेट शेअर केले. यात ट्विट केले आहे, या ट्विटमध्ये चित्रपटाच्या कमाईविषयी समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

अलीकडेच शकुंतलमबद्दल बोलत असताना, सामंथा एका मुलाखतीत म्हणाली, "ही एक प्रेमकथा आहे. आणि प्रेम हे स्वतःमध्येच एका विश्वासारखे आहे. आमचा सांस्कृतिक वारसा समृद्ध आहे.

या चित्रपटाची कथा आमच्या सर्वात जुन्या क्लासिक्सपासुन प्रेरित आहे. याशिवाय चित्रपटाची कथा, ग्राफिक्स आणि स्पेशल इफेक्ट्स हे महत्त्वाचे घटक आहेत. मी उत्साही आहे आणि थोडी नर्व्हसही आहे. चित्रपटाचे बजेट खूप जास्त आहे. पण मला वाटते की प्रेक्षकांना चित्रपट आवडेल".

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

SCROLL FOR NEXT