Satish Kaushik Passed Away Dainik Gomantak
मनोरंजन

Satish Kaushik यांचे शेवटचे 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण

Satish Kaushik: काही जवळच्या व्यक्तींजवळ त्यांनी आपल्या या इच्छेविषयी बोलून दाखवले होते.

दैनिक गोमन्तक

Satish Kaushik Passes Away: सतीश कौशिक यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने बॉलीवूडमधला गुणी कलाकार आणि दिग्गज निर्माता हरवल्याचे मत अमिताभ बच्चनपासून ते त्यांचे परममित्र अनुपम खेर यांनी व्यक्त केले आहे.

सतीश कौशिक यांच्या अचानक जाण्याने पोकळी होण्याबरोबरच त्यांचे स्वत:चे एक स्वप्न अपूर्ण राहिले असल्याचे म्हटले आहे.

सतीश कौशिक मागच्या काही वर्षांपासून ऑटोबायोग्राफीवर काम करण्याविषयी विचार करत होते. त्यांचा आयुष्याचा प्रवास पुस्तकाच्या स्वरुपात समोर यावा असे त्यांचे स्वप्न होते. गेल्या दोन महिन्यांपासून सतीश कौशिक यावर काम करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, काही जवळच्या व्यक्तींजवळ त्यांनी आपल्या या इच्छेविषयी बोलून दाखवले होते.

सतीश कौशिक यांच्या पुतण्याने निशांतने याविषयी माहिती दिली आहे. हरियाणापासून मुंबईपर्यत काकांचा प्रवास कमालचा राहिला आहे.

त्यांची ऑटोबायोग्राफी लिहण्याची इच्छा होती. त्यांचा हा प्रवास पुस्तुकरुपी समोर यावा यासाठी ते प्रयत्न करत होते.आपली गोष्ट त्यांनी स्वता लिहायला घेतली होती आणि ते एका चांगल्या लेखकाच्या शोधातदेखील होते. मला आठवते रिकाम्या वेळात ते लिहत असत असे निशांतने म्हटले आहे.

आम्ही त्यांच्या ऑटोबायोग्राफी स्वप्न जरुर पूर्ण करु आणि त्यांना लोकांपर्यत पोहचवू . त्यांच्या आयुष्यातला संघर्ष नक्कीच तरुणाईला प्रेरित करेल असे निशांतने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT