Satish Kaushik Last Movie Dainik Gomantak
मनोरंजन

Satish Kaushik Last Movie : सतीश कौशिक कंगना रणौतच्या या चित्रपटात शेवटचे दिसणार ऐतिहासिक भूमीकेत

अभिनेते सतीश कौशिक यांचा हा चित्रपट ठरणार शेवटचा....

Rahul sadolikar

ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचा काल हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, पण त्यांनी केलेल्या अजरामर भूमीका मात्र शेवटपर्यंत प्रेक्षक विसरणार नाहीत.'कॅलेंडर', 'पप्पू पेजर', 'मनु मुंद्रा' यासह अनेक अविस्मरणीय भूमिका साकारणारे बहुमुखी अभिनेते सतीश कौशिक आता आपल्यात नाहीत. 

 त्यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. त्यांनी या जगाचा निरोप घेतला यावर चाहत्यांनाही विश्वास बसत नाही. सोशल मीडियावर लोक त्यांची आठवण काढत आहेत. आता त्यांच्या निधनानंतर ते शेवटच्या वेळी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ते कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' या आगामी चित्रपटात दिसणार आहेत.

कंगना रणौतने 28 सप्टेंबर 2022 रोजी सतीश कौशिकच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर शेअर केले. या चित्रपटात सतीश कौशिक संरक्षण मंत्री जगजीवन राम यांची भूमिका साकारणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोक त्यांना जगजीवन राम बाबूजी म्हणायचे. ते भारतीय राजकीय इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक होते. 

या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे, मात्र अद्याप त्याची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. या चित्रपटात कंगना रणौत, मिलिंद सोमण, महिमा चौधरी, अनुपम खेर, विशाक नायर आणि श्रेयस तळपदे यांच्याही भूमिका आहेत. सतीशजी याआधी ओटीटीवर रिलीज झालेल्या 'छत्रीवाली' चित्रपटात दिसले होते

सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर कंगना रणौतने त्यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिले- या भयानक बातमीने उठले,

" ते माझे सर्वात मोठे चीअरलीडर होते, खूप यशस्वी अभिनेता आणि दिग्दर्शक होते, सतीश कौशिक जी वैयक्तिकरित्या खूप दयाळू होते. ते एक खरा माणूस होते, इमर्जन्सी चित्रपटावेळी त्यांचे दिग्दर्शन करणे मला आवडले. ओम शांती."

भारतीय राजकारणाला एक वेगळी दिशा देणाऱ्या आणि इतिहासावर दूरगामी परिणाम घडवून आणणाऱ्या आणिबाणीवर आधारित या चित्रपटाची आतुरता आता प्रेक्षकांना असणार आहे. या चित्रपटात भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमीका अभिनेत्री कंगना रणौत करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT