Allu Arjun Dainik Gomantak
मनोरंजन

Allu Arjun: गळ्यात लिंबाची माळ, हातात बंदुक; पुष्पा-2 मधील अल्लू अर्जुनचा लूक आउट

अल्लू अर्जुनचा पुष्पा-2 चित्रपटातील लूक समोर आला आहे.

Puja Bonkile

Allu Arjun New Look: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा द राइज' हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे सर्वजण उत्सुक आहेत. नुकताच अल्लू अर्जुननं सोशल मीडियावर त्याचा पुष्पा-2 चित्रपटातील लूकचा फोटो शेअर केला आहे. फोटोमधील अल्लू अर्जुनच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधुन घेतले आहे.

आज 8 एप्रिल अल्लू अर्जुनचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याने पुष्पा 2 चित्रपटातील लूक शेअर केला आहे. या फोटोमध्ये अल्लूने गळ्यात लिंबाची माळ घातली आहे, भरजरी साडी नेसली आहे. कानात झुमके, हातात बांगड्या असा श्रृंगार केला आहे.

अल्लू अर्जुनचा हा हटके लुक आहे. त्याच्या या लूकवरुन चित्रपटात (Movie) नेमके काय पाहायला भेटणार याचा अंदाज नेटकरी बांधताना दिसत आहेत.

पुष्पा 2 या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी एक टीझर शेअर करण्यात आला होता. या टीझरमध्ये अल्लू अर्जुन तुरुंगातून पळून गेल्याचे पाहायला मिळाले होते. पुष्पा जंगलात कुठे तरी जाऊन बसल्याचे टीझरमध्ये दाखवण्यात आले होते.

चित्रपटामधील अभिनेत्री रश्मिका मंदानाचा लूक रिव्हिल करण्यात आला होता. रश्मिकाने पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागात श्रीवल्ली ही भूमिका साकारली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT