Sameer wankhede Dainik Gomantak
मनोरंजन

Sameer wankhede: मुलाच्या सुटकेसाठी शाहरुखने विनंती केली होती..वानखेडेंनी कोर्टात दाखवले व्हॉट्सअप चॅट

कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत शाहरुखने आर्यनच्या सुटकेसाठी विनंती केल्याचं म्हटलं आहे.

Rahul sadolikar

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला आता 2 वर्षे पूर्ण झाली असली तरी या प्रकरणातले अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यात संवाद झाल्याचंही आता समीर वानखेडेंनी सांगितलं आहे.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या कथित ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीय. आज(19 मे) रोजी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत समीर वानखेडे यांनी आता गंभीर खुलासा केला आहे.

मुलाच्या सुटकेसाठी शाहरुखची विनंती

शाहरुखने माझ्याकडे मुलाच्या सुटकेची विनंती केली होती असं आपल्या याचिकेत सांगत समीर वानखेडे यांनी शाहरुखसोबत झालेले व्हॉट्स अप चॅटही कोर्टात दाखल केले आहे. हे चॅट कोर्टात सादर करताना वानखेडे यांनी आपण यात कुठेच पैशाची मागणी केली नाही असं सांगितलं.

CBI ने आजच शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचा जबाब घेतला त्यात तिने शाहरुखकडे वानखेडे यांनी 15 कोटी रुपयांची मागणी केली होती आणि त्यातले 50 लाख रुपये शाहरुखने दिले होते असा धक्कादायक खुलासा केला होता.

वानखेडेंसाठी पूजा ठरली डोकेदुखी

पूजा ददलानीच्या या जबाबानंतर समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेत या सगळ्या गोष्टींंना नाकारले आहे. विशेष म्हणजे यात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांचे जुने विधान समीर वानखेडेसाठी सर्वात मोठी अडचण ठरले आहे. पूजाचे हे विधान गेल्या वर्षी १६ जून रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या दक्षता अहवालाचा भाग होता. 

या आधारे CBI ने 2021 च्या कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे आणि इतर चार जणांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याचाही समावेश आहे.

मुनमुनचा वानखेडेंवर गंभीर आरोप

मुनमुन धमेचा या मॉडेलनेही समीर वानखेडेंवर आरोप केले आहेत. मिड-डे ला दिलेल्या माहितीनुसार, मुनमुन धमेचा भीतीपोटी गप्प बसली होती. पण आता सीबीआयने वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने सत्य बाहेर येईल. अशी अपेक्षा आहे.

प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्धीसाठी केवळ मीडिया प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्याने माझ्यासारख्या अनेकांना खोट्या प्रकरणात गोवले आहे. त्यांना माहीत आहे की, मीडिया त्यांच्या कारवाईला कव्हरेज देईल. म्हणून वानखेडे सातत्याने मॉडेल्स आणि सेलिब्रेटींना टार्गेट करत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT