Samantha Prabhu Dainik Gomantak
मनोरंजन

13 वर्षांच्या प्रवासासाठी Samantha Prabhuने मानले चाहत्यांचे आभार

अभिनेत्री समंथाने एक भावनिक पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत

Rahul sadolikar

आपल्या क्यूट लूक आणि अभिनयाने चाहत्यांना वेड लावणारी साऊथ इंडियन अभिनेत्री समंथा रुत प्रभूने एक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे.

2010 मध्ये 'ये माया चेसावे' या तेलुगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी आणि 'पुष्पा: द राइज' मधील 'ऊ अंतवा' या गाण्यात जिने आग लावली होती अशी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने 13 वर्षे पूर्ण केली आहेत. (Samantha Prabhu shares a gratitude note in new Social Media Post)

इंडस्ट्रीत आणि तिने तिच्या चाहत्यांचे प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. समंथाने पोस्ट शेअर करत या 13 वर्षांच्या प्रवासासाठी आभार मानले आहेत.

तिने रंगीबेरंगी फुलांचे छायाचित्र पोस्ट केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले: "मी जितकी मोठी होत जाते तितकी मी पुढे जात असते.

सर्व प्रेम आणि आपुलकी आणि प्रत्येक नवीन दिवसासाठी आणि सर्व चांगल्या गोष्टींसाठी मी मनापासून आभारी आहे. ज्या गोष्टींचा माझ्यावर परिणाम व्हायचा तो आता होत नाही. रोज फक्त प्रेम आणि कृतज्ञतेची लाट. धन्यवाद."

समंथा आणि नागा चैतन्य यांचं लग्न झालं होतं पण लग्नानंतर काही काळाने दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला आणि नंतर दोघे वेगळे झाले. 13 वर्षांचा आपला प्रवास पूर्ण झाल्यानंतर समंथाने केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंटस केल्या आहेत

काने लिहिले: "मला माहित आहे की तू कशी आणि कोठून सुरुवात केली आहे आणि आज तू कसा आहेस हे पाहून मला अभिमानाने भरून येते!! ग्रेस, ग्रिट, हस्टल, टॅलेंट, सचोटी आणि कधीही माघार न घेण्याची वृत्ती करिअरच्या 13 वर्षांपर्यंत. .नवा अध्याय नुकताच सुरू झाला आहे खूप छान दिसत आहे..आयर्न लेडीला पुढे जा.."

दुसर्‍या मैत्रिणीने तिचा एक जुना फोटो शेअर करत लिहिले: "मला सापडलेला हा फोटो पहा 14 वर्षांपूर्वी आमच्या टेरेसवर क्लिक केला होता 13 वर्षांसाठी अभिनंदन, येथे आणखी बरेच काही आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT