Samantha Dainik Gomantak
मनोरंजन

समांथा सोशल मीडियावरुन गायब? चाहत्यांनी व्यक्त केली काळजी

मागील १५ दिवसांपासून अभिनेत्री समांथा सोशल मीडियावरुन गायब

दैनिक गोमन्तक

अभिनेत्री समांथा रुथ प्रभु सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांना नेहमी नव्या प्रोजेक्ट्स आणि चित्रपटांबद्दल सोशल मीडियावर माहिती देत असते. दरम्यान मागील १५ दिवसांपासून अभिनेत्री सोशल मीडियावरुन गायब आहे. या १५ दिवसात सोशल मीडियावर तिची कोणतीही पोस्ट नसल्यामुळे तिच्या चाहत्यांकडून काळजी व्यक्त करण्यात आली आहे. (Samantha Ruth Prabhu)

अभिनेत्री समांथा रुथ प्रभु फक्त दाक्षिणात्य चाहत्यांमध्ये लोकप्रिय नसून जगभर तिची फॅन फॉलोइंग असल्याचे दिसून येते. अमेझॉन प्राईम वरील वेब सीरीज 'द फॅमिली मॅन 2'तील धडाकेदार काम आणि 'पुष्पा: द राइज'मधील 'ऊ अंटावा' आणि इतर गाण्यातील तिच्या दिलखेचक अदा यामुळे तिचे देशभर नाही तर जगभर चाहते झाले आहे. लवकरच ती 'कॉफी विथ करण सिझन 7'मध्ये अभिनेता अक्षय कुमार याच्यासह दिसणार आहे. सामंथा सोशल मीडियावरही ऍक्टिव्ह असते. मात्र गेल्या काही दिवसापासून तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून काही पोस्ट न दिसल्यामुळे तिच्या चाहत्यांना चिंता वाटू लागली आहे.

1 जुलैनंतर समांथाने कोणतीही पोस्ट शेअर केली नाहीये, त्यामुळे समांथा ठीक असेल का याबाबत चाहत्यांना चिंता वाटते आहे. समांथाने इन्स्टाग्रामवरची शेवटची पोस्ट एका पेड पार्टनरशिपविषयीची आहे. तसेच ट्विटरवर समांथाने 2 जुलै रोजी 'कॉफी विथ करण सिझन 7' या शोचा व्हिडिओ रिट्विट केला होता. त्यानंतर 5 जुलै रोजी 'ओह बेबी' सिनेमाविषयीची पोस्ट तिने रिट्विट केली आहे. यानंतर समांथाने सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट केलेली नाही.

समांथाच्या चाहत्यांना तिने अशाप्रकारे सोशल मीडियावरून गायब झाल्याबाबत चिंता वाटत आहे. यापूर्वी कधीही समांथाने सोशल मीडियावरुन असा ब्रेक घेतला नव्हता. जेव्हा ती आयुष्यातील कठीण काळातून जात होती. नागा चैतन्यशी घटस्फोट घेतल्यानंतरच्या काळातही समांथा इन्स्टाग्राम किंवा इतर सोशल मीडियावरती सक्रिय होती. समांथाने तिच्या घटस्फोटाविषयी माहिती चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातूनच दिली होती.आगामी काळात ती बॉलिवूडमधेही दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sexual Harassment Case: मनोरंजन विश्वात खळबळ! 'महाभारत' फेम 'भीम' सौरव गुर्जरला अटक; लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली 14 दिवसांची कोठडी

Madgaon Massacre 1890: स्मरण मडगाव हत्याकांडाचे! 21 सप्टेंबर 1890 रोजी मतदानाचा अधिकार मागणाऱ्या निःशस्त्र गोवेकरांवर गोळीबार; 23 जणांचा बळी

Child Writer: 'गौरवी, असेच आणखी लिहीत जा'; 10 वर्षांच्या बाललेखिकेच्या 29 निबंधांना मुख्यमंत्र्यांची दाद, पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन

Asian Games Final 2026: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रचणार इतिहास? फायनलसाठी भारताची ताकदवान फौज तयार; 'अशी' असणार संभाव्य प्लेइंग-11

Fire Case: आगीपूर्वी घराजवळ बादली घेऊन आलेला कोण? 2 मिनिटांत बादलीशिवाय परतला; दमोने कुटुंबातील सहा मृत्यूंच्या तपासाला नवे वळण

SCROLL FOR NEXT