Salman Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan : "मला बाबा व्हायचं आहे पण भारतीय कायदा"....सलमान खान हे काय बोलला..

अभिनेता सलमान खानने बाबा बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Rahul sadolikar

सलमान खान आणि त्याचं लग्न हा विषय सलमानच्या चाहत्यांसाठी काळजीचा विषय आहे. अभिनेता सलमान खानने खुलासा केला आहे की त्याने वडील बनण्याचा विचार केला होता. 

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमानने सांगितले की, त्याने एकदा मूल जन्माला घालण्याचा विचार केला होता पण 'भारतातील कायद्यांमुळे' त्याला ते शक्य झाले नाही. त्याने आपल्या लग्नाच्या योजनांबद्दलही सांगितले. 

सलमानचे मुलांवरील प्रेम सर्वांनाच माहीत आहे. अनेक फोटो आणि व्हिडिओंमध्ये तो अनेकदा आपल्या भाची आणि पुतण्यांसोबत वेळ घालवताना दिसतो. सलमानची बहीण अर्पिता खान हिला आयत शर्मा आणि अहिल शर्मा अशी दोन मुले आहेत. 

सलमानची दुसरी बहीण अलविरा खान हिलाही दोन मुले आहेत - अलिझेह अग्निहोत्री आणि अयान अग्निहोत्री. त्याचे भाऊ सोहेल आणि अरबाज यांनाही मुलगे आहेत.

टिव्हीवरच्या एका प्रसिद्ध कार्यक्रमाला दिलेल्या मुलाखतीत सलमानने मुलाच्या प्लॅनिंगबद्दल सांगितले. सलमान म्हणाला "आता काय सांगु तो काय प्लॅन होता? हा प्लॅन सुनेचा नाही बाळाचा होता. पण भारतीय कायद्यानुसार ते होऊ शकले नाही.आता बघुया काय होतं ते.

चाहत्यांनी सलमानला अलीकडेच अॅक्शन एंटरटेनर चित्रपट किसी का भाई किसी की जानमध्ये पाहिले. फरहाद सामजी दिग्दर्शित, या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, व्यंकटेश दग्गुबाती, भूमिका चावला, राघव जुयाल आणि जस्सी गिल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपट निर्माता करण जोहर दोन मुलांचा बाप असल्याची प्रतिक्रियाही सलमानने दिली. अभिनेता म्हणाला, "मी तोच प्रयत्न करत होतो पण तो कायदा कदाचित बदलला असेल. तर आता बघुया. मला लहान मुलांची आवड आहे. पण जेव्हा मुलं येतात तेव्हा त्यांची आईही येते. आई त्यांच्यासाठी खूप चांगली आहे. ती त्या मुलांचा चांगला सांभाळ करेल पण ती आई माझ्याकडुन पटायला हवी न? मी पटवण्याचा प्रयत्न करत होतो.

चाहत्यांनी सलमानला अलीकडेच अॅक्शन एंटरटेनर चित्रपट किसी का भाई किसी की जानमध्ये पाहिले. फरहाद सामजी दिग्दर्शित, या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, व्यंकटेश दग्गुबाती, भूमिका चावला, राघव जुयाल आणि जस्सी गिल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT