Salman Khan In Big Boss  Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan In Big Boss : सलमानने बिगबॉसमध्ये चक्क कॅमेऱ्यासमोर ओढली सिगारेट..भाईजानला झालंय तरी काय?

सलमान खानने बिग बॉसमध्ये कॅमेऱ्यासमोरच सिगारेट ओढल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.

Rahul sadolikar

सलमान खान बिग बॉसमधल्या एका व्हायरल फोटोमुळे चांगलाच चर्चेत आहे. सध्या Bigg Boss OTT 2 चांगलंच चर्चेत आहे. सलमान खान या शोचं होस्टिंग करतोय. Bigg Boss OTT 2 सध्या चांगलं रेटींग मिळवत आहे.

Bigg Boss OTT 2 च्या यंदाच्या सिझनचं होस्टींग सलमान खान करतोय. याआधीच्या सिझनचं होस्टींग करण जोहरने केलं होतं. Bigg Boss 16 सलमानने हिट केला. आता Bigg Boss OTT 2 सुद्धा सलमान खान त्याच्या खास शैलीत हिट करतोय. अशातच Bigg Boss OTT 2 चा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत सलमान खान नॅशनल कॅमेरासमोर सिगरेट ओढताना दिसतोय.

शोमध्ये रंगत वाढलीय

बिग बॉस OTT 2 दिवसेंदिवस मनोरंजक होत आहे, आणि आता शोला दोन आठवड्यांची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे Bigg Boss OTT 2 चे चाहते आनंदित होऊ शकतात.

या विकेंडच्या वारमध्ये सलमान चर्चेत असल्याचं आणखी एक कारण ठरला. सलमानने सिगारेट पकडलेली दिसली.

सलमानने हातात सिगारेट पकडलीय

सलमानने साहजिकच प्रत्येकाला जो सल्ला द्यायचा होता तो दिला. बिग बॉस हा असा रिअॅलीटी शो आहे की जिथे असंख्य कॅमेरा लागले असतात.

सलमान जेव्हा स्पर्धकांना झापत असतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला अनेक कॅमेरे असतात. अशाच एका कॅमेराने एका क्लिकला पकडण्यात यश मिळविले. या क्लिकमध्ये सलमानने सिगारेट धरलेली दिसतेय.

युजर म्हणतात सलमान ढोंगी आहे

एका युजरने लिहिले, “आम्हाला माहित आहे की सलमान ढोंगी आहे. पण सलमान जर इतरांना व्याख्यान देत असेल तर किमान त्यांच्यासमोर तरी चांगलं वागायचं.” दरम्यान, दुसऱ्याने तो स्पर्धकांना नैतिकतेवर कसे व्याख्याने देतो यावर प्रकाश टाकला. एका युजरने महत्वाची कमेंट केली की लिहिले, “हे OTT वर आहे. आणि नॅशनल टिव्ही नाही त्यामुळे मला वाटते की यामध्ये कोणतीही कायदेशीर समस्या नाही.

पण तो इतका ढोंगी आहे. स्पर्धकांना संस्कृती आणि विकृतीबद्दल व्याख्यान देतो आणि स्वतः प्रत्येक चुकीचे काम करत असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Homes: दिलासा! गोव्यात बेघर लोकांना मिळणार हक्काचे घर; CM सावंतांची घोषणा

Goa Government Jobs: गोव्यातील सरकारी खात्‍यांत 2618 पदे रिक्त; वीज, वन, सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये सर्वाधिक पदे

Rashi Bhavishya 29 July 2025: भावनिक अस्थिरता जाणवेल, आर्थिक बाबतीत नवीन संधी येतील; नव्या जबाबदाऱ्यांचं स्वागत करा

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

SCROLL FOR NEXT