Salman Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan Security: सलमान खानच्या सुरक्षेसंबधी प्रश्न! दोनजणांचा फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न

Salman Khan Security: या दोघांकडून पोलिसांना आधारकार्ड सापडले, मात्र ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

दैनिक गोमन्तक

Salman Khan Security: काही महिन्यांपूर्वी सलमान खानला बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. तेव्हापासून त्याच्या सुरक्षितेत वाढ झाली आहे. आता मात्र या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सलमानच्या फार्महाऊसमध्ये दोन अज्ञात व्यक्तींनी घुसण्याचा प्रयत्न केल्याची माहीती समोर आली आहे. नवी मुंबईतील पनवेल फार्म हाऊस येथे गुरुवार, ४ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता ही घटना घडली आहे.

जेव्हा सुरक्षारक्षकाच्या ही गोष्ट ध्यानी आली तेव्हा त्याने दोघांना अडवले. त्यावेळी या व्यक्तींनी आपण सलमानचे चाहते असल्याचे सांगितले मात्र सुरक्षारक्षकाने त्यांना पोलिसांच्या हवाली केले आहे.पोलिसांनी चौकशी केली असता या व्यक्तींनी आपली खोटी नावे सांगितल्याचे समोर आले आहे. या दोघांकडून पोलिसांना आधारकार्ड सापडले, मात्र ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

दोन्ही आरोपी संशयित असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अजेश कुमार गिल आणि गुरुसेवर सिंग अशी दोघांची नावे आहेत. चौकशीदरम्यान त्याने स्वत: पंजाब आणि राजस्थानचा असल्याचे सांगितले आहे.

मात्र, अजूनही कोणतीही ठोस माहिती मिळालेली नसून पोलिसांचा त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसत नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. बॉलीवूडच्या भाईजानला ज्या प्रकारे जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशा स्थितीत पोलिसांनी गाफील राहता येणार नसल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, सलमानचा टायगर ३ चित्रपटगृहात दाखल झाला होता. आता द बुल या चित्रपटात तो पुन्हा दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT