Salman Khan New Look| Kabhi Eid Kabhi Diwali Instagram
मनोरंजन

Salman Khan New Look: 'आता बिश्नोई गँग ओळखणार...' भाईजानच्या नव्या लूकवर नेटकऱ्यांची टिप्पणी

Salman Khan New Look: त्याचा 'तेरे नाम' चित्रपटातील लूक चांगलाच प्रसिद्ध झाला होता.

दैनिक गोमन्तक

Salman Khan New Look: बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खान नेहमीच चर्चेत असणारा आणि लाडका अभिनेता आहे. आता त्याने पून्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सलमान नव्या लूकमध्ये प्रेक्षकांच्या समोर आला आणि त्याने सर्वांनाच थक्क केले आहे.

सलमान खानने सध्या त्याच्या बाल्ड लूकमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका पार्टीदरम्यान त्याचा हा लूक चाहत्यांचा समोर आला आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्याला अशा अवतारात पाहून अनेकजण हैराण झाल्याचे चित्र सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे. याबरोबरच अनेकांनी त्याच्या लूकवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

  • नेटकऱ्यांनी दिल्या हैराण करणाऱ्या प्रतिक्रिया

एका युजरने त्याच्या या नव्या लूकवर कमेंट करत म्हटले आहे की, 'हेयर ट्रांसप्लांटचे काम पूर्ण झाले.' दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, 'सलमानने वीग काढले आहे, ' एक युजर म्हणतो, सलमान आता विचार करत असेल 'बिश्नोई गँगचे लोक मला ओळखू शकणार नाहीत.'

दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, 'सलमान आता म्हातारा दिसत आहे' तर काही नेटकऱ्यांनी त्याच्या लूकला शाहरुखच्या 'जवान' चित्रपटाचे प्रमोशन करण्याची नवीन पद्धत सांगितली आहे. सलमानचे अनेक चाहते मात्र त्याच्या या लूकवर नाराज असल्याचेही दिसून येत आहे.

आतापर्यंत सलमान( Salman Khan)ची हेअरस्टाईल लोकांच्या कुतुहलाचा भाग राहिली आहे. त्याचा 'तेरे नाम' चित्रपटातील लूक चांगलाच प्रसिद्ध झाला होता. त्याच्या अनेक चाहत्यांनी ही हेअरस्टाईल आपलीशी केली होती. मात्र त्याच्या या लूकवर त्याच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, सलमानचा नवीन लूक त्याच्या नवीन प्रोजेक्टचा भागदेखील असू शकतो असाही अंदाज लावला जात आहे. भाईजानने अलिकडेच बीग बॉसचे शूटिंग पूर्ण केले असून सध्या तो त्याच्या नवीन प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT