GodFather  Dainik Gomantak
मनोरंजन

GodFather साठी भाईजानने केले फ्रिमध्ये काम, मेगास्टार चिरंजीवी म्हणाले....

नुकतेच गॉडफादरचे 'थर मार ठक्कर मार' हे गाणे रिलीज झाले होते ज्यामध्ये चिरंजीवीसोबत सलमान खान देखील स्वॅगसह डान्स करताना दिसला होता.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड स्टार सलमान खान मेगास्टार चिरंजीवीच्या 'गॉडफादर' या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खान कॅमिओ करताना दिसणार असून तो चिरंजीवीच्या क्राइम पार्टनरची भूमिका साकारणार आहे. नुकतेच गॉड फादरचे 'थर मार ठक्कर मार' हे गाणे रिलीज झाले होते, ज्यामध्ये चिरंजीवीसोबत सलमान खानही स्वॅगसोबत डान्स करताना दिसला होता.

आता चिरंजीवीने या चित्रपटासाठी सलमान खानच्या फीबाबत खुलासा केला आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, सलमान खानने गॉडफादरमध्ये काम करण्यासाठी एक पैसाही घेतला नाही. पण प्रेक्षकांच्या प्रेमापोटी त्याने या चित्रपटाचा भाग होण्यास होकार दिला.

फ्लाइटमध्ये एका साऊथ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चिरंजीवीने बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार सलमान खानचे आभार मानले. मुलाखतीत चिरंजीवीला विचारण्यात आले की, सलमानने गॉडफादरसाठी किती पैसे घेतले? या प्रश्नावर तो म्हणाला, "सलमानने एकही पैसा न घेता हा चित्रपट केला आहे, तो हा चित्रपट फक्त चाहत्यांच्या प्रेमासाठी करत आहे, सलमान भाई (Salman Khan) आपको सलाम है. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो."

तमिळ भाषेत बनत असलेला हा चित्रपट मल्याळम चित्रपट 'लुसिफर' चा रिमेक आहे. राजा मोहन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात चिरंजीवीसोबत नयनतारा आणि सत्यदेव यांच्याही मुख्य भूमिका आहेत. गायिका श्रेया घोषाल हिने गॉड फादरचे 'थर मार ठक्कर मार' हे गाण गायले आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात प्रेक्षकांना राजकीय ड्रामा पाहायला मिळणार आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

SCROLL FOR NEXT