Salman Khan - Laurance Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan - Laurance : सलमानला मारण्याची जबाबदारी एका शूटरकडे... बिश्नोई गँगचं नेमकं काय चाललंय?

अभिनेता सलमान खानच्या जीवाला पुन्हा धोका निर्माण झाला आहे. सलमानला मारण्याची धमकी देणाऱ्या बिश्नोई गँगची

Rahul sadolikar

Salman Khan - Laurance Bishnoi : अभिनेता सलमान खानच्या जीवाला पुन्हा एकदा धोका निर्मान झाला असुन आता त्याला मारण्याची जबाबदारी बिश्नोई गँगच्या एका शूटरला मिळाल्याची माहिती मिळाली आहे.

लॉरेन्स बिश्नोईने या कामाची जबाबदारी गँगस्टर अनमोल बिश्नोईला दिल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. 

परदेशात बसलेला अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ असून त्याने या कामाची जबाबदारी अक्षय बिश्नोई याच्याकडे दिली आहे.

सलमानची चर्चा

बिग बॉस ओटीटी संपला असला तरी सलमान खान एका वेगळ्या कारणाने पुन्हा चर्चेत आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे हे सर्वांनाच माहीत आहे. बिश्नोई टोळीने राष्ट्रीय टीव्ही चॅनलवरही याची कबुली दिली आहे. 

पण आता दिल्ली पोलिसांच्या तपासात लॉरेन्स बिश्नोईने या कामाची जबाबदारी गँगस्टर अनमोल बिश्नोईला दिल्याचे समोर आले आहे. परदेशात बसलेला अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ असून त्याने या कामाची जबाबदारी अक्षय बिश्नोई याच्याकडे दिली आहे.

पिस्तूल परदेशातून मिळवले

 लॉरेन्स बिश्नोई टोळीला हे पिस्तूल परदेशातून पोहोचवले जात असल्याची माहिती आहे. पंजाबचा कुख्यात गुंड आणि अमेरिकेत असलेला आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र तस्कर रणजीत डुप्ला याच्याकडून ही शस्त्रे खरेदी केली जात आहेत. अनमोल बिश्नोईच्या माध्यमातून अक्षय बिश्नोई हा नवा चेहरा लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमध्ये सामील झाला आहे.

सलमानच्या कुटूंबालाही धोका

'किसी का भाई किसी की जान'च्या रिलीजवेळीही लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला ईमेल केला होता. त्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. केवळ सलमानच नाही तर त्याच्या कुटुंबालाही इजा करण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गर्ग या गुंडांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT