Salman- Aishwarya Viral Video Dainik Gomantak
मनोरंजन

Salman- Aishwarya Viral Video : सलमान, ऐश्वर्या आणि आराध्याचा हा व्हिडीओ का होतोय व्हायरल?

सध्या सोशल मिडीयावर सलमान खान, ऐश्वर्या आणि आराध्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने चाहत्यांनी भुवया उंचावल्या आहेत...

Rahul sadolikar

सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहुन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा व्हिडीओ एका कार्यक्रमातला आहे. आणि या व्हिडीओत बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि चक्क ऐश्वर्या रॉय आणि तिची मुलगी आराध्या दिसत आहे.

अलीकडेच मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात स्टार्सचा मेळा पाहायला मिळाला. निमित्त होते मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाचे, जिथे केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील तारकांचा मेळा भरला होता. यावेळी रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, सलमान खान, शाहरुख खान असे अनेक बॉलिवूड स्टार्स दिसले. 

या प्रसंगाचा एक व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे, जो पाहून काही चाहते आश्चर्यचकित झाले आहेत तर काही खूप खुश आहेत. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची जोडी एकत्र पाहण्याची इच्छा असलेले चाहते आनंदी आहेत. 

वास्तविक या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान एकत्र पोज देत आहेत आणि आराध्या बच्चन सुद्धा मध्ये दिसत आहे. 20 वर्षांनंतर एकत्र दिसलेल्या दोघांच्या या व्हिडिओचे संपूर्ण सत्य काय आहे ते जाणून घेऊया.

सलमान आणि ऐश्वर्याच्या या व्हिडिओमध्ये बॅकग्राउंडमध्ये 'मैने प्यार किया' चित्रपटाचे गाणे वाजत असून तिघेही इकडे-तिकडे तोंड फिरवून कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहेत. समोरचा कॅमेरामनही त्याला पोज देण्यास सांगत आहे. आश्चर्य व्यक्त करताना, अनेकांनी म्हटले आहे की ते अगदी खरं वाटतंय.

याआधी, सलमान खान, आराध्या आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या या व्हिडिओवर चाहते खूप उत्सुक दिसत आहेत. दोघेही एकत्र चांगले दिसत असल्याचे लोकांनी लिहिले आहे. काहींनी आनंदही घेतला आहे आणि म्हटले आहे – भाईजानची बायको आणि आराध्याचे कपाळ या जन्मात दिसणार नाही.

  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काहीही तथ्य नाही. हा व्हिडीओ मॉर्फ करण्यात आला आहे. हे दोन्ही व्हिडीओ वेगवेगळे आहेत कुणीतरी दोघांचे वेगवेगळे व्हिडीओ एडिट करून एकत्र केले आहेत आणि ते अगदी खरे दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT