Sajid Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Sajid Khan: फरहान अख्तरच्या घरुन चोरली 'ही' गोष्ट; साजिद खानने सांगितला भन्नाट किस्सा

Sajid Khan: साजिद खानने लहानपणी रस्त्यावर टूथपेस्ट विकण्यापासून ते चोरी करण्यापर्यंत अनेक कामं केली आहेत.

दैनिक गोमन्तक

Sajid Khan: बॉलिवुडचा प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक साजिद खान बिग बॉस 16 मध्ये स्पर्धक म्हणून पहायला मिळतोय. मागील बऱ्याच काळापासून वेगवेगळ्या वादात अडकलेल्या साजिद खानने या शोमधून दणक्यात टीव्हीवर परत एंट्री केली. त्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. फिल्म इंडस्ट्रीतल्या टॉप दिग्दर्शकांमध्ये साजिदचे नाव घेतले जाते.

साजिद खान सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय दिग्दर्शक आहे. मात्र साजिद खानला हा टप्पा गाठण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. बिग बॉसच्या काही भागांमध्ये साजिद आपल्या जुन्या खडतर दिवसांच्या आठवणी सांगताना आढळून आला. बहीन फराह आणि साजिदने खूप गरीबीत दिवस काढले आहेत. लहानपणी रस्त्यावर टूथपेस्ट विकण्यापासून ते चोरी करण्यापर्यंत अनेक कामं केल्याचे साजिदने म्हटले आहे.

Sajid Khan

दरम्यान, एकेकाळी प्रसिद्ध दिग्दर्शक (Director) असलेल्या कामरान खान यांचा साजिद खान हा मुलगा आहे. सगळा पैसा त्यांनी एका फिल्मला लावला आणि तीच फिल्म फ्लॉप झाली. त्यानंतर कर्जबाजारी झालेल्या खान कुटुंबावर हालाखीचे दिवस आले. साजिद खानने त्याबद्दल सांगितले की, 'घरात गरीबी आणि मी मात्र श्रीमंत मुलांच्या शाळेत जायचो. त्या सगळ्यामुळे माझं डोकं खराब झालं होतं.'

पुढे साजिदने एक किस्सा सांगताना म्हटले की, 'मला वाईट संगत लागली होती. एकदा मी माझा नातेवाईक असलेल्या फरहान अख्तरच्या घरी नाइकीचे शूज आणि निकॉनचा कॅमेरा चोरला होता. त्यावेळी माझ्या घरच्यांनी मला पोलीस स्टेशनमध्ये नेले होते. त्यांना वाटलं की असं केल्यामुळे माझ्यात काही सुधारणा होईल.'

अशा परिस्थितीतून स्वत:ला सावरत खूप मेहनत घेऊन साजिद खानने बॉलिवुड (Bollywood) मध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. सध्या साजिद खान बिग बॉसमध्ये चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT