The Kashmir Files, Amir Khan's Reaction on The Kashmir Files Movie, Amir Khan News Dainik Gomantak
मनोरंजन

The Kashmir Files: प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहावा; आमिर खान

आमिर खानने या चित्रपटाबाबत सांगितलेल्या गोष्टी सध्या चर्चेत आहेत.

दैनिक गोमन्तक

'द कश्मीर फाइल्स': 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाचे मोठ्या संख्येने प्रेक्षक आणि काही कलाकारांकडून खुलेपणाने कौतुक केले जात असताना, अनेक बड्या स्टार्सनी आतापर्यंत या चित्रपटाबद्दल काहीही सांगितलेले नाही, त्यामुळे ते लोकांच्या निशाण्यावर आहेत. मात्र, आमिर खानने या चित्रपटाबाबत सांगितलेल्या गोष्टी सध्या चर्चेत आहेत. वास्तविक आमिर खान (Amir Khan) एस.एस. राजामौली यांचा चित्रपट 'RRR' प्रमोशनल इव्हेंटमध्ये पाहुणा म्हणून उपस्थित होता. या दरम्यान विवेक अग्निहोत्रीच्या 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटावर त्याने काही मते मांडली. (Amir Khan's Reaction on The Kashmir Files Movie)

'RRR' चित्रपटाची टीम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल्लीला होती, याठीकाणी ज्युनियर एनटीआर, राम चरण, आलिया भट्टही यांची उपस्थिती होती. या कलाकारांसोबत आमिर खानही या मंचावर दिसला. आमिर खानला 'काश्मीर फाइल्स' (The Kashmir files) या चित्रपटाबद्दल काही प्रश्न करण्यात आले होते. दरम्यान तो म्हणाला, 'मी काश्मीर फाइल्स नक्कीच पाहीन, कारण हा चित्रपट आमच्या इतिहासाचा एक भाग आहे.

'प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट बघावा असे तो म्हणाला. त्यांनी अनेक गोष्टी उघडपणे सांगितल्या आहेत. ते म्हणाले, 'काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांसोबत जे घडले ते निश्चितच अत्यंत खेदजनक आहे.

या विषयावर बनलेला असा चित्रपट प्रत्येक भारतीयाने नक्कीच पाहिला पाहिजे आणि माणसावर अत्याचार झाल्यावर आपल्याला कसे वाटते हे प्रत्येक भारतीयाने लक्षात घ्यायला हवे.

'या चित्रपटाने (Bollywood Movie) प्रत्येक व्यक्तीच्या भावनांना स्पर्श केला आहे', 'या चित्रपटाने मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भावनांना स्पर्श केला आहे आणि हेच त्याचे सौंदर्य आहे.' हा चित्रपट मी नक्कीच पाहीन आणि हा चित्रपट यशस्वी झाल्याचा मला आनंद आहे, असेही आमिर खानने म्हटले आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटात 1990 ची घटना दाखवण्यात आली आहे जेव्हा मोठ्या संख्येने हिंदू काश्मीरमधून स्थलांतरित झाले होते. या चित्रपटात अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, भाषा सुंबली, पल्लवी जोशी असे अनेक दिग्गज कलाकार दिसले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड दहशत निर्माण केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Lok Sabha Speech: काँग्रेसच्या काळातच 'नक्षलवाद' फोफावला! अमित शाह यांचं टीकास्त्र; इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत वाचला चुकांचा पाढा

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT