Shweta Tiwari Dainik Gomantak
मनोरंजन

अभिनेत्री श्वेता तिवारीचं वादग्रस्त वक्तव्य, हिंदू संघटनांचा संताप

या वादग्रस्त विधानाबाबत आता हिंदू संघटनांनी श्वेता तिवारीवर टीकेची झोड उठवली आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) नुकतेच एक वादग्रस्त वक्तव्य केले, ज्यामुळे हिंदू धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तीने आपल्या अंतर्वस्त्राच्या आकाराबाबत एक वक्तव्य केले आणि देवदेवतांचा त्यात उल्लेख केला ज्यामुळे लोक संतापले. या वादग्रस्त विधानाबाबत आता हिंदू संघटनांनी टीकेची झोड उठवली आहे. (Ruckus on Controversial statement of actress Shweta Tiwari Hindu organization)

गृहमंत्र्यांकडे एफआयआरची (FIR) मागणी

या प्रकरणाबाबत संघटनेने मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांकडे श्वेता तिवारी आणि वेब सीरिजच्या दिग्दर्शकाविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. श्वेताने आपल्या वक्तव्याबद्दल जनतेची माफी मागावी, अन्यथा हिंदू संघटना (Hindu organization) भोपाळमध्ये (Bhopal) वेब सीरिजचे शूटिंग होऊ देणार नाही, असा इशारा हिंदू संघटनेने दिला आहे.

नेत्याने केले मोठे विधान

अभिनेत्री श्वेता तिवारीच्या वादग्रस्त विधानानंतर हिंदू संघटनेचे हिंदुत्ववादी नेते चंद्रशेखर तिवारी यांनी श्वेता तिवारीवर हिंदूंच्या भावना दुखावण्याचा ठेका घेतल्याचा आरोप केला आहे. त्यांनी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्याकडे एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. भोपाळमध्ये त्यांच्या वेब सीरिजच्या शूटिंगला परवानगी दिली जाणार नाही, असा इशारा हिंदू संघटनेने दिला आहे.

काय आहे प्रकरण

आज बुधवारी श्वेता तिवारी तिच्या आगामी वेब सीरिजच्या घोषणेसाठी भोपाळला पोहोचली होती. जिथे तिने आपल्या संपूर्ण टीमसह पत्रकार परिषदेत भाग घेतला. येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना श्वेता तिवारीचे वादग्रस्त वक्तव्य समोर आले. श्वेता तिवारी म्हणाली, 'माझ्या ब्रा ची साईज देवच घेत आहेत' तेव्हापासून सोशल मीडियावर श्वेताला फटकारले जात आहे. श्वेता तिवारी आणि रोहित रॉय सारखे सेलिब्रिटी काल भोपाळमध्ये फॅशनशी संबंधित वेब सिरीज 'शो स्टॉपर' (Show Stopper) ची घोषणा करण्यासाठी आले होते. श्वेताने भोपाळमध्ये मीडियासमोर लोकांची मने दुखावणारी ही गोष्ट बोलून स्वत:लाच अडचणीत आणले आहे. यादरम्यान, स्टेजवरील चर्चेत श्वेता तिवारीने गंमतीने हे वादग्रस्त विधान केले होते असेही म्हटले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT