RRR Success Party News Dainik Gomantak
मनोरंजन

RRR सक्सेस पार्टीत आलिया भट्ट आणि अजय देवगण गायब

मुंबईत राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या 'आरआरआर' च्या सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

'बाहुबली'सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट बनवणारे दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या 'RRR' या चित्रपटाला भरघोस यश मिळाले आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून जवळजवळ प्रत्येक आवृत्ती एकत्रित करून, RRR ने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे निर्माते खूप खूश आहेत. यामुळे मुंबईत राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या 'आरआरआर' च्या सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. (RRR Success Party News)

* हे कलाकार पार्टीत सहभागी
RRR या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये चित्रपटाचे दोन्ही मुख्य नायक राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या उपस्थितीने पार्टीची शोभा वाढली होती. या पार्टीत अभिनेता राम चरण अनवाणी पोहोचला होता यामुळे त्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. पार्टीत करण जोहर, आमिर खान, जॉनी लीव्हर, राखी सावंत, जयंतीलाल गडा, सतीश कौशिक आणि जावेद अख्तर यांच्यासह सर्व बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते.

* अजय देवगण आणि आलिया होते गैरहजर
एसएस राजामौली यांच्या RRR या चित्रपटामध्ये अभिनेते अजय देवगण आणि आलिया भट्ट यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाच्या सक्सेस पार्टीतून दोन्ही कलाकार गायब होते. अलीकडे, अशी बातमी आली होती की आलिया भट्ट चित्रपटात (Movie) तिची स्क्रीन स्पेस पाहून खूश नाही आणि म्हणूनच तिने सोशल मीडियावरून आरआरआरशी संबंधित काही पोस्ट काढून टाकल्या आहेत. यानंतर आलियाने असे काही नसल्याचे स्पष्ट केले होते. तसे, सध्या आलिया भट्टच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. कदाचित आलिया लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. आता अशा परिस्थितीत तिचे आरआरआरच्या पार्टीत न येणे समजण्यासारखे आहे, पण अजय देवगण कोणत्या कारणांमुळे गैरहजर होते ? हा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT