RRR Movie  Dainik Gomantak
मनोरंजन

'RRR'ने केला 600 कोटींचा टप्पा पार

दैनिक गोमन्तक

साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांचा 'आरआरआर' हा चित्रपट दररोज कमाईचे रेकॉर्ड तोडत आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे ताजे आकडे शेअर केले आहेत. त्यानुसार राजामौली यांच्या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने 120.59 कोटींचा गल्ला जमवला आहे. (RRR movie earns 600 crores worldwide)

'पोस्ट पॅंडेमिक' 'आरआरआर' पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने शुक्रवारी 20.07 कोटी, शनिवारी 24 कोटी, रविवारी 31.50 कोटी, सोमवारी 17 कोटी, मंगळवारी 15.02 कोटी, बुधवारी 13 कोटींची कमाई करत 120.59 कोटींचा टप्पा पार केला आहे.

'आरआरआर' चित्रपट जागतिक बाजारपेठेतही नवे विक्रम करत आहे. व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांच्या मते, चित्रपटाने 5 दिवसात 600 कोटी कमावले आहेत. सहाव्या दिवशी 'आरआरआर'ने (RRR) 50.74 कोटींचा व्यवसाय केला. यासह, 'आरआरआर'चे जगभरातील बॉक्स ऑफिस (Box Office) कलेक्शन 6 दिवसात 672.16 कोटी झाले आहे. चित्रपटाची वाटचाल आता 700 कोटींकडे आहे. 'आरआरआर'ने 672.16 कोटी कमाई करून बाहुबलीला मागे टाकले आहे. हा सर्वाधिक कमाई करणारा 7वा भारतीय चित्रपट ठरला आहे.

सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये दंगल, बाहुबली 2, बजरंगी भाईजान, पीके, संजू, बाहुबली, सुलतान यांसारख्या चित्रपटांचा (Movies) समावेश आहे. 'आरआरआर' या आठवड्यात थिएटरमध्ये जॉन अब्राहमच्या 'अटॅक'शी स्पर्धा करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पिराचीकोंड-डिचोली येथील बेकायदेशीर झोपडपट्टी हटविण्यास सुरुवात, परिसरात तणाव

Ganthvol: गोव्याच्या प्रेरणादायी विद्यार्थी चळवळीचा इतिहास ‘गांठवल’मधून उलगडणार

Bastora Crime: 'अंगावरील दागिने सांभाळा..' अशी बतावणी करत तोतया सीबीआय पोलिसांचा दागिन्यांवर डल्ला

Colva Crime: कोलव्‍यात पुन्हा राडा! पार्टीतील वादातून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण; अर्धमेल्‍या युवकाला बाणावलीत सोडले

हॉटेलमध्ये झाली मैत्री, लग्नाचे आमिष देऊन केला लैंगिक अत्याचार; गोव्याच्या तरुणाला छत्तीसगड येथे अटक

SCROLL FOR NEXT