Rocky Aur Rani Prem Kahani Dainik Gomantak
मनोरंजन

Rocky Aur Rani Prem Kahani : रॉकी आणि राणीने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांचा रॉकी और राणी की प्रेमकहाणी हा चित्रपट नुकताच रिलीज झाला असुन पहिल्या दिवशी चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

Rahul sadolikar

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani box office collection Day 1: सध्या हिंदी मनोरंजन विश्वात रॉकी और राणी की प्रेमकहाणीची जोरदार चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवासांपासून बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' 28 जुलै हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. दिग्दर्शक करण जोहरला या चित्रपटाकडून खुप अपेक्षा होत्या.

प्रेक्षक आणि समिक्षकांचाही या चित्रपाटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बॉलिवूडने जुना काळ पुन्हा मोठ्या पडद्यावर आणला आहे असं हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सांगितलं.

चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन

या चित्रपटाचे ओपनिंग कलेक्शन काय असेल याची चित्रपट निर्मात्यांना उत्सुकता होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काय कमाल केली याकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. आता चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार ओपनिंग करत पहिल्याच दिवशी जबरदस्त कलेक्शन केले आहे.

चित्रपटाची कमाई

मिडिया रिपोर्टनुसार, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास 11.50 कोटींचं कलेक्शन केलं आहे. आता हे चित्रपटाच्या कमाईचे अंदाजित आकडे असले तरी अधिकृत आकड्यांमध्ये काही बदल होऊ शकतो. हा चित्रपट पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी चित्रपटगृहांमध्ये आलिया अन् रणवीरच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.

चित्रपटाला सध्या कुठलीही स्पर्धा नाही...

आता या चित्रपटाला वीकेंडचा फायदा देखील मिळू शकतो कारण सध्या हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाले असून बॉलिवूड चित्रपट याला टक्कर देण्यासाठी नाही. त्याचा फायदा नक्कीच रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या चित्रपटाला होईल. विकेंडला हा चित्रपट जबरदस्त कलेक्शन करू शकतो.

चित्रपटाचं बजेट आणि कमाई

रॉकी और रानी की प्रेमकहानी' या चित्रपटाच्या बजेटबद्दल बोलायचं झालं तर 160 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला. ज्यात तुम्हाला करण जोहरच्या जून्या चित्रपटाची पुर्ण झलक दिसते.

हाय एनर्जी, ओव्हर-द-टॉप जोक, कधीकधी खूप मजा, खुप सारा मेलोड्रामा या सगळ्याचा अनुभव या चित्रपटात मिळेल. हा चित्रपट देशभरातील 3200 हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे.

मल्टीस्टारर चित्रपट

'रॉकी आणि राणीची प्रेमकथा' या चित्रपटात अनेक हिट कलाकार आहेत. या मल्टीस्टारर चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्याशिवाय धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन, क्षिती जोग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT