Ranbir Kapoor and Mahira Khan Relationship News Dainik Gomantak
मनोरंजन

रणबीर आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिराच्या व्हायरल फोटोंवर ऋषी कपूर म्हणाले...

ऋषी कपूर म्हणाले होते की, 'तो तरुण आहे आणि त्याला वाटेल त्याला भेटू शकतो.'

दैनिक गोमन्तक

2017 मध्ये अभिनेता रणबीर कपूर आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचे काही फोटो समोर आले होते, ज्यामध्ये दोन्ही स्टार्स एकमेकांसोबत सिगारेट ओढताना दिसले होते. हे फोटो समोर आल्यानंतर दोघांच्या नात्याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. दिवंगत अभिनेते आणि रणबीरचे वडील ऋषी कपूर यांनाही फोटोंबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यावर ऋषी कपूर म्हणाले होते की, 'तो तरुण आहे आणि त्याला वाटेल त्याला भेटू शकतो.'

त्यावेळी एका वेबसाईटशी बोलताना ऋषी कपूर म्हणाले होते, "मी त्यांना फक्त ट्विटरवर पाहिले आहे, इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर नाही कारण मी फक्त ट्विटरवर आहे. आणि त्याच्याबद्दल सर्व काही मला आधीच माहित आहे. रणबीर हा तरुण स्टार आहे, तो सिंगल आहे, तो बॅचलर आहे. तो ज्याला वाटेल त्याला भेटू शकतो. लोकांनी त्याच्या प्रायव्हसीवर हल्ला केला तर ते योग्य नाही. आणि या सगळ्याबद्दल मी काहीही बोलू शकत नाही. कारण तो तरुण आहे आणि तो कोणत्याही मुलीला भेटू शकतो."

त्यावेळी ऋषी कपूर यांनी माहिरा आणि रणबीरच्या अफेअरच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या, ऋषी कपूर म्हणाले होते, 'जर ते डेट करत असतील किंवा एकत्र असतील तर मुंबईतील लोकांना हे कळले नसते का?' अशाप्रकारे त्यांनीन या प्रकरणामध्ये आपल्या मुलाची बाजू घेऊन सर्व अफवा खोडून काढल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT