Rekha Dainik Gomantak
मनोरंजन

Rekha: 'या' खास व्यक्तीसाठी लावते सिंदूर... अखेर रेखाने उलगडले रहस्य

Rekha: नवीन फोटोशूटदरम्यान सिंदूर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Rekha: बॉलीवूडमध्ये अशा काही दिग्गज अभिनेत्री आहेत ज्यांचे महत्व, प्रसिद्धी आणि लोकप्रियता आजही तशीच टिकून आहे. या अभिनेत्रींमध्ये एक नाव प्रामुख्याने येते ते म्हणजे रेखाचे. रेखा जितकी आपल्या अभिनय, एकापेक्षा एक दिलेल्या हीट चित्रपटांमुळे जितकी चर्चेत राहिली तितकीच ती आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील लोकांच्या रोजच्या चर्चांचा भाग बनली.

आता रेखा नव्याने चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे एका विदेशी मॅगझीनसाठी रेखाने फोटोशुट केले आहे. आंतरराष्ट्रीय वोग अरेबिया या मॅगझीनसाठी केलेल्या फोटोशूटमध्ये रेखा अत्यंत सुंदर दिसत असून तिने लावलेले सिंदूर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

68 वर्षाच्या रेखाने आपल्या हटके लूक आणि सौंदर्यामुळे पून्हा एकदा सर्वांचे लक्ष आपल्याकडे वळवले आहे. वोग अरेबियासाठी रेखाने फोटोशूट तर केलेच आहे पण त्याचबरोबर दिलखुलास गप्पादेखील मारल्या आहेत. प्रेम आणि रिलेशनशिप या विषयांवरदेखील भरभरुन गप्पा मारल्या आहेत.

वोग अरेबिया या आंतरराष्ट्रीय मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत प्रेमावर बोलताना रेखा म्हणते की,जेव्हा तुम्ही एखाद्या वस्तूवर किंवा एखाद्या माणसावर खूप प्रेम करता तेव्हा ते प्रेम कधी संपतं का? एकदा नातं जोडलं की ते कायमसाठी किंवा आयुष्यभरासाठी आपल्यासोबत असतं. कधी कधी आपल्याला ते आणखी हवं असतं तर कधी जेवढं मिळालं आहे तितकही पुरेसं असतं आणि माझ्यासाठी हे लागू होतं.

अमिताभवरच्या प्रेमावर काय म्हणते रेखा

2004मध्ये सीमी ग्रेवालच्या एका टॉकशोमध्ये रेखाला अमिताभवर आजही प्रेम आहे का असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी रेखाने अत्यंत सुंदर उत्तर दिले होते.

रेखाने म्हटले आहे की संपूर्ण जग त्यांच्यावर प्रेम करते. मग लहान मुले असू देत वृद्ध लोक किंवा महिला ,पुरुष सगळे अमिताभवर प्रेम करतात. मग मलाच का हा प्रश्न विचारला जातो की माझं अमिताभवर प्रेम आहे का ? पुढे बोलताना म्हटले आहे पूर्ण दुनियेचे प्रेम एकत्र करुन त्यात आणखी थोडे मिसळा. माझ्या मनात त्यांच्याबद्दल अशाच भावना आहेत असे रेखाने म्हटले आहे. बॉलीवूडमध्ये रेखा आणि अमिताभच्या जोडीने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे.

रेखा सिंदूर का लावते?

अविवाहित असूनही रेखा अनेकदा खास कार्यक्रमावेळी सिंदूर लावताना दिसते. जेव्हा 1980 ला रेखाने ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या लग्नात सिंदूर लावून हजेरी लावली होती तेव्हा तीने अमिताभच्या नावाचे सिंदूर लावल्याचे म्हटले होते.

मात्र 1982 मध्ये 'उमराव जान' साठी जेव्हा रेखाला नॅशनल अवॉर्ड मिळाले होते त्यावेळी तिने आपले सिंदूर लावण्याचे कारण स्पष्ट केले होते. ती म्हणते मी ज्या शहरातून येते, तिथे सिंदूर लावणे फॅशन मानले जाते. याबरोबरच तिला सिंदूर लावायला आवडत असल्याने ती सिंदूर लावत असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT