Rekha  Dainik Gomantak
मनोरंजन

'तुझा अभिनय पाहण्यासाठी मी जिवंत आहे' म्हणत रेखाने केले 'या' कलाकाराचं कौतूक

एका अवॉर्ड शोमध्ये रेखा यांनी बॉलिवूडमधील एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचं कौतुक केलं होतं.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा (Rekha) यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. अनेक पुरस्कार सोहळ्याला रेखा या हजेरी लावतात. त्यांच्या रेड कार्पेट लूकला नेहमीच चाहत्याची नेहमी पसंती मिळते. काही दिवसांवपूर्वी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या 'स्टार स्क्रीन अवॉर्ड्स' शोमध्ये रेखा उपस्थित होत्या. या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक देखील सेलिब्रिटी उपस्थित होते. रणवीर सिंह (Ranveer Singh), शाहिद कपूर (Shahid Kapoor), ह्रतिक रोशन (Hrithik Roshan), अनन्या पांडे (Ananya Pandey), मलायका अरोरा (Malaika Arora) यांनी या पुरस्कार सोहळ्यामध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये रेखा यांनी बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याचं भरभरून कौतुक केलं होतं.

या पुरस्कार सोहळ्यामध्ये रेखाला (Rekha) 'गेस्ट ऑफ ऑनर' म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. जेव्हा रेखा या स्टेजवर गेल्या तेव्हा स्टेजवर रणवीर सिंह (Ranveer Singh) हा त्यांच्या स्वागतासाठी उभा होता. त्यावेळी रेखा यांनी रणवीरचं भरभरून कौतुक केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, 'मी रणवीर सिंहचा अभिनय पाहण्यासाठी जिवंत आहे.' रेखा यांनी केलेलं कौतुक ऐकून रणवीर खूप आनंदी झाला.

रणवीरचा 'जयेशभाई जोरदार' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या आगामी चित्रपटामध्ये (Movie) देखील रणवीरने मुख्य भूमिका साकारली आहे. रणवीरसह या चित्रपटामध्ये धर्मेंद्र, शबाना आझमी, आलिया भट आणि जया बच्चन हे कलाकार देखील प्रमुख भूमिkemकेमद्धे दिसणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT