Rekha Alia Bhatt Dainik Gomantak
मनोरंजन

Rekha - Alia Bhatt : "आता किस होईल असं वाटलं" रेखा आणि आलियाच्या त्या व्हिडीओवर नेटीजन्स भडकले

अभिनेत्री रेखा आणि आलिया भट्ट यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामुळे नेटीजन्स चांगलेच चिडले आहेत

Rahul sadolikar

सोशल मिडीया एक असं माध्यम आहे ज्यात कुठलीही गोष्ट लपून राहत नाही, तंत्रज्ञानात झालेल्या क्रांतीने जगाला एक छोटं खेडं बनवलं आहे, एखादी गोष्ट क्षणार्धात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते.

सध्या अभिनेत्री रेखा (Rekha) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत आलिया भट्ट आणि रेखा एकमेकींच्या अगदी जवळ आल्या आहेत, साहजिकच यावरून आता नेटीजन्सच्या भन्नाट कमेंट्स समोर येत आहेत. चला पाहुया नेमका काय आहे हा व्हिडीओ?

सोमवारी २० फेब्रुवारी रोजी मुंबईत दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 संपन्न झाला . या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्ट आणि रेखा यांच्या यांचा लूक सर्वांच्या चर्चेचा विषय होता.

यावेळी आलिया भट्टने पांढऱ्या रंगाची साडीत साडीत दिसली. तिने आपले केस मोकळे ठेवले होते यावेळी तिच्या कानात डायमंडचे एअररिंग्स होते. रेखा यांनी ऑफव्हाईट रंग असलेली आणि गोल्डन बॉर्डर असणारी साडी नेसली होती. आणि नेहमीप्रमाणे त्यांनी लाल रंगाची लिपस्टिक आणि मेकअप केला होता.

या व्हिडीओत आलिया ही गाडीतून खाली उतरली . गाडीतून उतरताच तिला रेखा दिसल्या आणि त्यानंतरत्या दोघींनी एकमेकांना जाऊन घट्ट मिठ्ठी मारली. त्यावेळी त्या दोघींनी गप्पाही मारल्या. त्यानंतर त्या दोघींनी हातात हात घालून या सोहळ्यात एंट्री घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओवर नेटीजन्सनी मग कमेंटसचा पाऊस पाडला. एक म्हणाला “असं वाटलं की लिप किस करणार आहेत.” तर दुसऱ्या एका युजरने “आलिया किती चिपकते आहे.” तर एकाने “ना सिंदूर लावलं आहे, ना मंगळसूत्र. त्यावर पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे. असं मी केलं असते तर माझ्या सासूने मला टोमणे मारले असते”, अशी कमेंट केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: गोकुळाष्टमीच्या निमित्त जय श्रीराम अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमातेची पूजा

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT