Reena Roy Shatrughan Sinha Dainik Gomantak
मनोरंजन

Reena Roy : शत्रुघ्न सिन्हा आणि मोहसीन खान यांच्यासोबतच्या नात्याबद्दल हे काय म्हणाल्या रीना रॉय?

अभिनेत्री रीना रॉय यांचा आज वाढदिवस. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी आपल्या भुतकाळातील गोष्टी शेअर केल्या आहेत

Rahul sadolikar

वयाच्या 15व्या वर्षा चंदेरी दुनियेत आपलं नशीब आजमायला एक मुलगी आली होती.आणि 'जरूरत' नावाची पहिला चित्रपट तीला मिळालाही. त्यानंतर तीचा इंडस्ट्रीतला प्रवास अथकपणे सुरू झाला.

मोठमोठ्या अभिनेत्यांच्या सोबतीने तीने स्क्रिन शेअर केली. आम्ही ज्या अभिनेत्री बोलतोय ती म्हणजे नागीन फेम रीना रॉय. आज रीना रॉय यांचा वाढदिवस, आज बोलुया त्यांच्या आयुष्यातल्या काही गोष्टींबद्दल

अत्यंत कमी वयात बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावणाऱ्या या अभिनेत्रीला व्यक्तिगत आयुष्यात मात्र अनेकदा वादग्रस्त स्थितीला तोंड द्यावं लागलं. प्रेम आणि लग्न या दोन्ही बाबतीत रीना रॉय यांना नशीबाने साथ दिली नाही असंच म्हणावं लागेल.

रीना रॉय यांनी नागिन', 'आशा', 'काली चरण', 'नसीब', 'सनम तेरी कसम' अशा त्याकाळात गाजलेल्या सिनेमांतुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यांचे असंख्य फॅन्स त्या काळातल्या त्यांच्या ग्लॅमरस लुकवर फिदा होते. आज रीना रॉय यांचा वाढदिवस त्यानित्ताने त्यांच्या आयुष्यातल्या एका वादग्रस्त पर्वावर बोलुया..

एका मुलाखतीत रीना रॉय यांनी त्यांच्या आयुष्यातल्या अत्यंत महत्वाच्या विषयावर प्रकाश टाकला. रीना रॉय यांच्या आयुष्यात सुरूवातीला अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची एन्ट्री झाली. त्यांच्यासोबत रीना रॉय यांच्या अफेअरची चर्चा खुप झाली.

त्यानंतर त्यांच्या आयुष्यात पाकिस्तानी क्रिकेटर मोहसीन खान याची एन्ट्री झाली. दोघांनी लग्नही केलं. पण त्यांचं तेही लग्न टिकु शकलं नाही, आज त्यांच्या या गत आयुष्यावर बोलताना त्यांना मला याबद्दल आजिबात पश्चात्ताप किंवा वाईट वाटत नाही असं त्या म्हणाल्या.

त्या म्हणतात, "मला कसलाच पश्चात्ताप नाही, आयुष्यात चढ- उतार तर येतच असतात. जेव्हा तुम्ही कच्चे असता आणि वयाच्या 15व्या वर्षी तुम्ही लाईमलाईट मध्ये येता, जेव्हा दिवस रात्र तुमच्या सेटवर तुमची आई असते तेव्हा तुम्ही काय विचार कराल?

तुम्हाला तुमचं वेगळं काहीतरी करावं लागेल. तुमच्यापेक्षा मोठे तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तुम्ही त्यांचं काही ऐकत नाही, ज्याचे परिणाम तुम्हाला नंतर भोगावे लागतात. मला माझ्या भूतकाळाबद्दल काहीच तक्रार नाही, त्यात काही बदल होणार नाही, गोळी बंदुकीतुन सुटली आहे, आता ती पुन्हा परतणार नाही".

थोडक्यात रीना रॉय या आपला भूतकाळ विसरल्या नसल्या तरी त्याची सल मात्र त्यांच्या मनात अजुन आहे. आपल्या नात्यांबद्दल बोलताना त्या भावुक झाल्या हे त्यांच्या बोलण्यातुन दिसलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT