BellBottom look Dainik Gomantak
मनोरंजन

BellBottom: अक्षय कुमारच्या चित्रपटाने जिंकली चाहत्यांची मने

बऱ्याच काळानंतर चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा BellBottom चित्रपट खूप पसंत केला जात आहे.

दैनिक गोमन्तक

अक्षय कुमारच्या (Akshay kumar) बेल बॉटम (BellBottom) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता त्यांची प्रतीक्षा संपली आणि आज हा चित्रपट थेटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. अक्षयच्या स्पाय थ्रिलर चित्रपटात त्याच्यासोबत लारा दत्ता, वाणी कपूर आणि हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत दिसत आहेत. बऱ्याच काळानंतर चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा चित्रपट खूप पसंत केला जात आहे.

चित्रपटगृहात अक्षय कुमारचा बेलबॉटम बघण्यासाठी बरेच लोक गेले आहेत. बेलबॉ़म बघून प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. चाहत्यांना या चित्रपटात अक्षयची स्टाईल खूप आवडत आहे. बेल बॉटम चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर #BellBottomInCinemas ट्विटरवर ट्रेंड करत आहे. एका वापरकर्त्याने लिहिले - अक्षय कुमार हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरहिरो आहे.

दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले - शेवटी प्रतीक्षा संपली आणि अक्षय सर आपल्या शैलीत पुन्हा सिनेमाकडे परतले.

चला हा अद्भुत चित्रपट बघायला जाऊया. आशा आहे हा एक उत्तम चित्रपट असणार.

अक्षय कुमारला अॅक्शन करताना पाहणे ही प्रेक्षकांसाठी मेजवानी असेल.

बॉक्स ऑफिसचा अंदाज

रक्षाबंधनाच्या पुढे बेल बॉटम रिलीज झाल्याने या चित्रपटाला फायदा होणार आहे . रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट पहिल्या दिवशी 5-7 कोटींचा व्यवसाय करू शकतो. मात्र अनेक राज्यांमध्ये कोरोनामुळे अजूनही चित्रपटगृहे पूर्णपणे खुली केली नाहीत त्यामुळे त्याचा फटकाही या चित्रपटाला बसण्याची शक्यता आहे.

अक्षय कुमारच्या बेल बॉटम या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर ही एक अपहरणाची कथा आहे. ज्यामध्ये काही दहशतवाद्यांनी एका विमानाचे अपहरण केले आणि ते अमृतसरमध्ये उतरले. त्यानंतर अक्षय कुमार त्याच्या टीमसह प्रवाशांना वाचवण्यासाठी आणि दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT