One Friday Night Dainik Gomantak
मनोरंजन

One Friday Night : सस्पेन्सचा तडका... रवीना आणि मिलींद सोमनच्या 'वन फ्रायडे नाईट'चा ट्रेलर रिलीज

Rahul sadolikar

मनोरंजन विश्वात सध्या ओटीटीवर रिलीज होणाऱ्या आगामी वन फ्रायडे नाईटचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. रवीना टंडन आणि मिलिंद सोमण यांच्या मुख्य भूमीका असलेली आगामी वेब सीरिज 'वन फ्रायडे नाईट सस्पेन्सचा आगळा वेगळा अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. 

हा शो तुम्ही OTT प्लॅटफॉर्मवर विनामूल्य पाहू शकता. याचे दिग्दर्शन मनीष गुप्ता यांनी केले आहे. तुम्ही ते कधी आणि कुठे पाहू शकता ते चला पाहुया.

ड्रामा, रोमान्स, सस्पेन्स, रिलेशनशीप अन् बरंच काही

90 च्या दशकातील प्रसिद्ध स्टार्स, रवीना टंडन आणि मिलिंद सोमण वन फ्रायडे नाईट नावाची वेब सीरिज घेऊन येत आहेत. या शोमध्ये तुम्हाला भरपूर ड्रामा, रोमान्स, सस्पेन्स, रिलेशनशिप, सिक्रेट्स आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतील. याची निर्मिती ज्योती देशपांडे आणि मनीष त्रिहान यांनी केली आहे, तर दिग्दर्शन मनीष गुप्ता यांनी केले आहे. हा शो तुम्ही विनामूल्य पाहू शकता.

अशी आहे गोष्ट

एक शुक्रवारची रात्र राम, एका श्रीमंत माणसाच्या भोवती केंद्रस्थानी आहे, जो स्वतःला त्याच्या अर्ध्या वयाच्या नीरूच्या प्रेमसंबंधात अडकलेला दिसतो. त्यांची प्रेमकहाणी असे वळण घेते जे अपेक्षित नव्हते. राम अपघातात गंभीर जखमी झाला आहे, त्याला काळजीची नितांत गरज आहे. दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे, नीरूला रामची पत्नी लताशी संपर्क साधण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यास भाग पाडले जाते. हा निर्णय काय आहे? यासाठी तुम्हाला थोडा धीर धरावा लागणार आहे.

मिलिंद सोमन पुन्हा एकदा

मिलिंद सोमण शेवटचा अॅक्शन-थ्रिलर 'लकडबघा' मध्ये दिसला होता. लकडबघा या वर्षाच्या सुरुवातीला रिलीज झाला होता. तो पुढे कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारणार आहे.

'KGF Chapter 2' नंतरचा रवीनाचा प्रोजेक्ट

रवीना टंडनबद्दल बोलायचे तर, ती अखेरची प्रशांत नीलच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'KGF Chapter 2' मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. आगामी रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'घुडछडी'मध्ये ती संजय दत्तसोबत दिसणार आहे. जिओ स्टुडिओने सादर केलेला हा शो तुम्ही जिओ सिनेमा अॅपवर पाहू शकता. 28 जुलैपासून ते OTT प्लॅटफॉर्मवर ब्रॉडकास्ट होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT