Rashmika Mandanna Engagement Breakup Dainik Gomantak
मनोरंजन

रश्मिका मंदानाने या कन्नड अभिनेत्यासोबत लग्न का तोडले? जाणून घ्या कारण

Rashmika Mandanna Engagement Breakup : रश्मिका मंदान्नाची 2017 मध्येच एंगेजमेंट झाली होती, पण तिची एंगेजमेंट फार काळ टिकली नाही.

दैनिक गोमन्तक

Rashmika Mandanna Engagement Breakup: कन्नड चित्रपट अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या सर्वत्र चर्चेत आहे. तिच्या एका झलकसाठी चाहते आतुर झाले आहेत. रश्मिकाने तिच्या फिल्म करिअरमध्ये अनेक मोठे हिट चित्रपट दिले आहेत. रश्मिकाला फॅन्स 'नॅशनल क्रश' म्हणतात, पण तुम्हाला माहीत आहे का की रश्मिका मंदान्नाची 2017 मध्येच एंगेजमेंट झाली होती, पण तिची एंगेजमेंट फार काळ टिकली नाही. (Rashmika Mandanna Engagement Breakup)

वास्तविक 26 वर्षीय रश्मिका मंदान्ना चित्रपट अभिनेता रक्षित शेट्टीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. रश्मिकाने आपल्या करिअरची सुरुवात रक्षित शेट्टीसोबत किरिक पार्टी या चित्रपटातून केली होती. यादरम्यान दोघे जवळ आले आणि 2017 मध्ये एकमेकांशी साखरपुडा केला होता. मात्र, दैवाला त्यांचे नाते मान्य नव्हते. रश्मिका आणि रक्षित त्यांच्या साखरपुड्याच्या 14 महिन्यांनंतरच ते वेगळे झाले.

रश्मिका आणि रक्षितचे नाते का तुटले?

रश्मिका आणि रक्षित शेट्टीची एंगेजमेंट का तुटली याबद्दल दोघेही उघडपणे बोलले नाही. मात्र, दोन्ही स्टार्समध्ये कामाच्या बाबतीत ताळमेळ नसल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

याशिवाय असेही म्हटले गेले होते की, दोघांचे कुटुंब हे दोन्ही स्टार्सच्या एंगेजमेंटच्या ब्रेकअपचे कारण आहे. मात्र, रश्मिका आणि रक्षितने एंगेजमेंट ब्रेकअप होण्यामागच्या कारणांबद्दल कधीही काहीही सांगितले नाही.

रश्मिका मंदान्ना आता केवळ साऊथच्या फिल्म इंडस्ट्रीतच नाही तर बॉलिवूडमध्येही वर्चस्व गाजवायला तयार आहे. तिच्याकडे सध्या सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू', अमिताभ बच्चनसोबत 'गुडबाय' असे तीन हिंदी चित्रपट आहेत. याशिवाय तिने अलीकडेच सांगितले की ती लवकरच तिसरा चित्रपट साईन करणार आहे. तिचा नुकताच आलेला 'पुष्पा' हा चित्रपट खूप गाजला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT