Ranveer Singh Photoshoot Controversy| Nude Photoshoot Dainik Gomantak
मनोरंजन

Ranveer Singh Nude Photoshoot: न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांची नोटीस

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमदील प्रसिध्द अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) अनेक दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे (Nude Photoshoot) चर्चेत आहे. रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटने त्याच्या अडचणीत वाढ झाली असुन त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. आता त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांकडून नवी नोटीस त्याला देण्यात आली आहे. यामुळे आता त्याला लवकरच चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे.

न्यूड फोटोशूट प्रकरणी मुंबई (Mumbai) पोलिसांनी रणवीर सिंहच्या घरी जाऊन त्याच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यासंदर्भात चौकशीसाठी त्याला नोटीस देण्याचा प्रयत्न आज केला. दरम्यान यावेळी रणवीर सहपरिवार घरी नसल्याने मुंबई पोलिसांना परत यावे लागले. दरम्यान चेंबुर पोलिसांची टीम यावेळी त्याच्या घरी गेल्याचं समोर आले आहे. त्याला आता पोलिसांनी (Police) 16 ऑगस्टपर्यंत नोटीस स्विकार करण्याची सूचना दिली आहे. तसंच त्याला 22 ऑगस्ट पर्यंत चौकशीसाठी बोलवले जाऊ शकते अशी माहितीही समोर येत आहे.

काय आहे प्रकरण?

रणवीर सिंह या vs पेपर या मॅगझीनसाठी न्यूड फोटो शुट केलं होतं. मात्र त्याला हे फोटोशुट (Photoshoot) चांगलंच महागात पडणार असल्याचं चित्र आहे. रणवीर सिंह विरोधात न्यूड फोटोशूटप्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. न्यूड फोटोसेशन करणारा अभिनेता रणवीर सिंह विरोधात मुंबईतल्या चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 292, 293, 509 आणि इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी कायद्याच्या कलम 67 अ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीरच्या न्यूड फोटोसेशनविरोधात एका सामाजिक कार्यकर्त्यानं तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: गोवा आघाडीत बिघाडी? पाटकरांच्या 'त्या' विधानाला काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरेंचाही पाठींबा!

ISL 2024-25: आजच्या सामन्यात एफसी गोवाला ऐतिहासिक विक्रमाची संधी! ठरणार पहिलाच संघ

Cutbona Jetty: 'ते' अजूनही 'कुटबण' स्वच्छतेत सामील होऊ शकतात! मंत्री सिक्वेरांचे आमदार सिल्वांना आवाहन

Cuncolim IDC: ..तर लोकच कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहत बंद पाडतील! फिशमिल प्रदूषणावरुन आलेमाव यांचा इशारा

Goa: गोव्यात रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांची आता खैर नाही, थेट वाहन जप्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

SCROLL FOR NEXT