Ranveer Singh Dainik Gomantak
मनोरंजन

'10 कोटी दे, नाहीतर...'; रणवीर सिंग बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर! रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबारानंतर आता 'बाजीराव' निशाण्यावर

Ranveer Singh Extortion Threat : बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग याला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून 10 कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी मिळाल्याने चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली.

Manish Jadhav

Ranveer Singh Extortion Threat: बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग याला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून 10 कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी मिळाल्याने चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. एका व्हॉट्सॲप व्हॉइस नोटद्वारे ही धमकी देण्यात आली असून मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरु केला आहे. रणवीरच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी आता कडक बंदोबस्त तैनात केला असून खबरदारीचे सर्व उपाय योजले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हस्तक असलेल्या हॅरी बॉक्सर याने ही धमकी दिली. रणवीरच्या मॅनेजरला अमेरिकेतील एका फोन नंबरवरुन ही व्हॉइस नोट पाठवण्यात आली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये 10 कोटी रुपयांची मागणी करत रणवीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली होती, त्यानंतर लगेचच रणवीरला ही धमकी मिळाल्याने पोलीस अधिक सतर्क झाले आहेत.

मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करत असताना ज्या अमेरिकन नंबरवरुन मेसेज आला, त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी अमेरिकेतील (America) अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. काही दिवसांपूर्वीच रणवीरच्या मॅनेजरचा जबाबही नोंदवण्यात आला असून पोलीस या प्रकरणातील तांत्रिक पुरावे गोळा करत आहेत.

रणवीर सिंग सध्या त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. त्याने 'डॉन 3' हा मोठा चित्रपट सोडल्यामुळे फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या प्रोडक्शन हाऊससोबत त्याचे मतभेद झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, सध्या चाहत्यांचे लक्ष त्याच्या आगामी 'धुरंधर 2: द रिव्हेंज' या चित्रपटाकडे लागले आहे.

आदित्य धर दिग्दर्शित या बहुप्रतिक्षित चित्रपटात रणवीरसोबत आर. माधवन, संजय दत्त, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांसारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार असून बॉक्स ऑफिसवर त्याची टक्कर दक्षिणात्य सुपरस्टार यश याच्या 'टॉक्सिक' या चित्रपटाशी होणार आहे. एका बाजूला चित्रपटाची उत्सुकता आणि दुसऱ्या बाजूला अंडरवर्ल्डकडून मिळालेली धमकी यामुळे रणवीर सिंग सध्या चर्चेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT