Rani Mukerji At Iffi Dainik Gomantak
मनोरंजन

Rani Mukerji: राणीने आमिरच्या 'लगान'मध्ये 'या' कारणामुळे केले नाही काम;IFFI मध्ये मोठा खुलासा

Rani Mukerji: राणी मुखर्जीने भारताच्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिरने तिला 'लगान' ऑफर केल्याचा खुलासा केला.

दैनिक गोमन्तक

Rani Mukerji: काही कलाकार हे प्रेक्षकांचे कायम लाडके असतात. राणी मुखर्जी ही त्या अभिनेत्रीपैकी आहे, जिने आपल्या अभिनयाने, दिसण्याने वेगवेगळ्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. आता राणी मुखर्जीने भारताच्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिरने तिला 'लगान' ऑफर केल्याचा खुलासा केला.

राणी मुखर्जीने तिच्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. असे अनेक चित्रपट केले जे तिच्या कारकिर्दीतील मैलाचे दगड ठरले. काही चित्रपटांमध्ये राणी मुखर्जीचीही जागा घेण्यात आली होती. पण अभिनेत्रीला याचा कोणताही पश्चाताप नाही. पण तिला एका गोष्टीची खंत नक्कीच आहे की ती इच्छा असूनही आमिर खानचा 'लगान' चित्रपटात काम करू शकली नाही.

'लगान'ची निर्मिती आमिर खानने केली होती आणि आशुतोष गोवारीकर दिग्दर्शक होते. त्यानंतर हा चित्रपट भारताच्या वतीने ऑस्करलाही गेला होता. राणी मुखर्जीने भारताच्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिरने तिला 'लगान' ऑफर केल्याचा खुलासा केला.

राणी मुखर्जी म्हणाली, 'मला अशी कोणतीही खंत नाही, पण दुर्दैवाने डेट क्लॅशमुळे मी आमिर खानच्या 'लगान' चित्रपटाचा भाग होऊ शकले नाही. आमिर माझा मित्र आहे, जेव्हा तो 'लगान'ची तयारी करत होता तेव्हा त्याने मला तो चित्रपट ऑफर केला होता. या चित्रपटातून आमिरही पहिल्यांदा निर्माता बनत होता.

चित्रपटात भूमिका केल्या जाणार्‍या सर्व कलाकारांनी गुजरातमधील भुज येथे एका विशिष्ट तारखेसाठी म्हणजे 6 महिन्यांसाठी एकत्र राहावे अशी त्यांची इच्छा होती आणि चित्रपटाचे शुटिंग संपण्यापूर्वी इतर कोणताही चित्रपट साइन न करण्याची अट त्याने घातली होती.

राणी पुढे म्हणाली, 'जेव्हा आमिरने मला 'लगान'ची ऑफर दिली, तोपर्यंत मी एक चित्रपट साइन केला होता, ज्याचे 20 दिवस शूटिंग बाकी होते. 10-15 दिवसही परत येऊ देणार नाही, असे आमिरने स्पष्टपणे सांगितले. मला आमिरच्या 'लगान'मध्ये काम करायचं होतं, म्हणून मी आधीच साइन केलेला चित्रपट सोडेन असं ठरवलं होतं, त्यासाठी मी त्या चित्रपटाच्या निर्मात्याशी बोललो तेव्हा त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की ते शक्य नाही. मात्र या चित्रपटात ज्याने जी व्यक्तिरेखा साकारली आहे, त्याने ती उत्तमरित्या साकारली आहे.

'लगान' 2001 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सनी देओलच्या 'गदर: एक प्रेम कथा'शी टक्कर झाली. हा त्या वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला. 'गदर'मध्ये आमिर खानच्या सोबत ग्रेसी सिंग होती. एवढेच नाही तर या चित्रपटाने 8 राष्ट्रीय पुरस्कारही जिंकले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Hadfade Birch Fire Case: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT